राजन पाटलांच्या राम सातपुते यांना राजकीय टीप्स ; हा फोटो वेधतोय लक्ष
सोलापूर : सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातील भाजप मित्र पक्षाचे उमेदवार राम सातपुते यांना मोहोळ तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील हे यंदा महायुती सोबत असल्याने निश्चितच भाजपला त्यांचा फायदा होणार असल्याचे चित्र आहे.
आमदार राम सातपुते यांनी मोहोळ तालुक्याच्या दौऱ्यापूर्वी राजन पाटील यांच्याशी बराच वेळ चर्चा केली. या राजकीय गप्पांचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून राजन पाटलांकडून तालुक्यातील राजकीय टिप्स तर राम सातपुते घेत नसतील ना अशी चर्चा हा फोटो पाहून सुरू आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे महायुती सोबत आल्यानंतर शरद पवारांचे कट्टर समर्थक मानले जाणारे राजन पाटील यांनी सुद्धा भविष्यातील राजकीय समीकरणे ओळखून अजित पवार यांच्यासोबत जाणे पसंत केले त्यानंतर सोलापुरात महायुतीचा पहिला मेळावा संपन्न झाला होता.
या मेळाव्यामध्ये राजन पाटील यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात जितके तालुके आहेत त्या सर्व तालुक्यातील एक मतदान मोहोळ तालुका जास्त देईल अशी घोषणा केली. मोहोळ तालुक्यात राजन पाटील यांच्यासोबत उमेश पाटील, विजयराज डोंगरे, तसेच आमदार यशवंत माने यांची ताकद भाजपला मिळाल्याने यापूर्वी काँग्रेसला मताधिक्य देणारा मोहोळ तालुका यंदा भाजपला तारणार का? अशीही चर्चा ऐकण्यास मिळते.