पालकमंत्र्यांच्या बैठकीला प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्याची दांडी ; तात्काळ संदीप कोहिनकर यांनी घेतले सांभाळून
सोलापूर : जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याच्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी महत्त्वाची बैठक जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात घेतली या बैठकीत त्यांनी प्रत्येक विभागनिहाय अधिकाऱ्यांकडून आढावा जाणून घेतला.
ज्यावेळी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचा विषय आला तेव्हा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कुठे आहेत प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून विचारले. काही वेळ सर्वजण इकडे तिकडे बघू लागले. जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख हे या बैठकीला उपस्थित नव्हते.
त्यावेळी पहिल्या रांगेत बसलेले जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी तातडीने लगेच उठून प्राथमिक शिक्षण विभागाचा आढावा सांगितला.
पालकमंत्री पाटील यांनी यावेळी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा या दुरुस्त झाल्या पाहिजे अशा सूचना देताना दुरुस्ती कामासाठी लागेल तेवढा निधी आपण द्यायला तयार आहोत, कामे वेळेवर करून घ्या, सप्टेंबर मध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल त्यामुळे लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता देऊन वर्क ऑर्डर द्या अशा सूचना जिल्हा परिषदेला केल्या.