कादर शेख सोलापूरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी तर माध्यमिकला आले सचिन जगताप
सोलापूर : प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रभारी शिक्षणाधिकारी कृपया अंधारे यांची प्रमोशनने लातूरला बदली झाली त्यांच्या जागेवर तब्बल दीड वर्षानंतर परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला पूर्णवेळ शिक्षणाधिकारी मिळाला आहे यापूर्वी सोलापूर महापालिकेतील प्राथमिक शिक्षण मंडळामध्ये प्रशासन अधिकारी म्हणून कामकाज केलेले आदर्श यांची जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
तर माध्यमिक शिक्षण विभागात ही बदल झाला असून विद्यमान शिक्षणाधिकारी मारुती फडके यांची अखेर शासनाने बदली केली आहे त्यांच्या जागेवर सोलापूरच्या माध्यमिक शिक्षण अधिकारीपदी सचिन जगताप यांची नियुक्ती केली आहे. सचिन जगताप हे वर्धा जिल्ह्यातून सोलापूरला येत आहेत तर कादर शेख हे यापूर्वी गोंदिया जिल्ह्यात माध्यमिक शिक्षणाधिकारी होते.
फडके हे सुद्धा जुलै 2023 या वर्षी जिल्हा परिषदेमध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून आले परंतु त्यांना व्यवस्थित कामकाज करता आले नाही दर महिन्याला ते रजेवर जात होते, याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे या त्यांच्या कामकाजावर प्रचंड नाराज दिसून आल्या होत्या.