सोलापूर : चार हुतात्मा यांच्या बलिदान दिनानिमित्त काँग्रेस पक्षाच्या वतीने ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये अभिवादन करण्यात आले.
यावेळी माध्यमांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूरच्या दौऱ्या संदर्भात तसेच राम मंदिर लोकार्पण संदर्भात प्रश्न उपस्थित केले. यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी हा भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा अजेंडा आहे. रामनवमी ऐवजी ते 22 जानेवारीला करीत आहेत हे आता लोक समजले आहेत तरी त्याला घाबरायचे कारण नाही.
प्रणिती शिंदे यांनी मोदींच्या दौऱ्यावरून टीका केली. निवडणूका आल्या की दौरे वाढतात असे सांगत एप्रिल महिन्यात रामनवमी असताना त्यांनी 22 जानेवारीला राम मंदिराचे लोकार्पण करण्याचा घाट घातला आहे परंतु त्यांच्यासाठी तो दिवस अपशकुन ठरेल अशी भूमिका मांडली.