प्रणिती शिंदे व राम सातपुते आले आमने सामने ; राम सातपुते यांच्या उत्साहात घोषणा ; जय श्रीराम, जय भवानी जय शिवाजीच्या नाऱ्याने परिसर दुमदुमला
सोलापूर : सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघात यंदा अतिशय कांटे की टक्कर होत आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टी कडून आमदार राम सातपुते तर काँग्रेस पक्षाकडून आमदार प्रणिती शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. प्रचाराचा जोर ही वाढलेला आहे. दरम्यान हे दोन्ही एकमेकांचे विरोधक उमेदवार प्रथमच एकमेकांच्या समोर आले निमित्त होतं ते म्हणजे गुढीपाडवा सणा निमित्त निघालेली शोभायात्रा.
बाळीवेस मध्ये या शोभा यात्रेचा शुभारंभ झाला. त्यावेळी एका बाजूने राम सातपुते तर दुसऱ्या बाजूने प्रणिती शिंदे हे पूजेसाठी थांबून होते. पूजेनंतर शोभा यात्रेला सुरुवात झाली. राम सातपुते हे मात्र अतिशय जोशात “जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा” अशा जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर दुसरीकडे प्रणिती शिंदे यांच्या बाजूने जय भवानी, जय शिवाजी तसेच जय श्रीराम चा नारा जोरात गुंजला.
यावेळी दोन्ही उमेदवारांनी शोभायात्रेत सहभाग नोंदवला. दुसरीकडे प्रणिती शिंदे यांनी महिलांसोबत फुगडी खेळली तसेच अनेक महिलांनी त्यांच्यासोबत सेल्फीही काढल. यावेळी भाजप उमेदवार राम सातपुते मात्र आक्रमक घोषणाबाजी देताना दिसून आले.