देशद्रोह्यांना शिक्षा नाही मात्र देशप्रेमींना शिक्षा ; पोलिसांचा हा कसला न्याय ; राजा इंगळे त्यांचा संताप
सोलापूर : पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजा इंगळे यांच्या नेतृत्वाखाली परभणी येथील संविधान अवमान घटनेचा निषेध करण्यात आला.
पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेच्या पुनम गेट समोर जोरदार निदर्शने केली. यावेळी बंटी उबाळे, अनिल सोनकांबळे अंकुश मडीखांबे, लौकिक इंगळे, अजय मस्के यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजा इंगळे म्हणाले, संविधानाची विटंबना म्हणजे देशद्रोह आहे असे असताना देशद्रोह्यांऐवजी देशप्रेमी यांना शिक्षा होणे हे दुर्दैवी आहे. या घटनेत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून पोलिसांच्या मारहाणीत मृत्युमुखी पावलेल्या सूर्यवंशीला न्याय मिळाला पाहिजे अन्यथा पीपल्स रिपब्लिकन पार्टी तीव्र आंदोलन करेल असा इशारा दिला.