पंढरपूर- मंगळवेढ्यात ‘दादा’चं पुन्हा ; भाजपची समाधान आवताडे यांना उमेदवारी
सोलापूर : पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघाचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना भाजपने दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. भाजपच्या दुसऱ्या यादीत आवताडे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.
दिवंगत नेते भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर- मंगळवेढा या मतदारसंघाची पोट निवडणूक लागली होती, त्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली त्या निवडणुकीत काटे की टक्कर झाली त्यात आवताडे यांनी बाजी मारली.
भाजपला मंगळवेढा पंढरपूरने 106 वा आमदार दिला. त्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला शब्द दिला होता, या भागाच्या पाण्याचा प्रश्न मिटवू तसेच तुम्ही मला 106 वा आमदार द्या मी महाविकास आघाडी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करतो. महायुती सरकारच्या काळात आवताडे यांनी मंगळवेढा तालुक्यातील पाण्याचा मिटविण्यात यशस्वी झाले.
आमदार आवताडे यांनी मोठा निधी खेचून आणून या भागाचा कायापालट केल्याचे पाहायला मिळाले. त्याचेच बक्षीस म्हणून समाधान आवताडे यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. आता पुन्हा आवताडे आणि भालके यांच्यात तर लढत होण्याची शक्यता आहे, मात्र माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी जर बंडखोरी केली तर तिरंगी लढत दिसेल हे नक्की.