
ओवेसी गेले अन् पठाण पण गेले ; नई जिंदगीतच राहणार फक्त तौफिक पैलवान
सोलापूर : यंदाच्या महापालिकेची निवडणूक चांगलीच गाजत आहे महाराष्ट्रातील बहुतांश मुस्लिम समाज हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडे आकर्षित झाल्याने बऱ्याच ठिकाणी एमआयएम पक्ष डॅमेज झाल्याचे दिसून आले.
ही अशी पहिलीच निवडणूक असेल की एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांना संपूर्ण महाराष्ट्रात फिरावे लागले प्रत्येक ठिकाणी सभा घ्यावे लागल्या एका जिल्ह्यात तर दोन दोन तीन वेळा त्यांनी सभा घेतल्या.
सोलापुरात तीन दिवसात त्यांच्या दोन सभा झाल्या एक सभा पानगल प्रशालेच्या मैदानावर झाली तर दुसरी सभा लगेच तिसऱ्या दिवशी तौफिक शेख यांच्या प्रभाग क्रमांक 20 मध्ये त्यांना घ्यावी लागली.
एका पैलवान ने एमआयएमला चांगलेच जेरीस आणल्याचे दिसून येते. ओवेसी यांच्यानंतर परत पक्षाचे माजी आमदार मुंबई नेते वारीस पठाण हे सुद्धा सोलापूरला येऊन गेले त्यांनीही नई जिंदगी भागात सभा घेतली.
2017 मध्ये नगरसेवक झाल्यानंतर पैलवान मे नई जिंदगी ला आपले घर केल्याचे चित्र आहे. या भागातील गोरगरीब, गरजू, सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीला धावून जाणे, त्यांना मदत करणे, त्यांच्या सुखा:दुखात सहभागी होणे हे काम पैलवान नित्यनेमाने करतात.
केवळ तौफिक शेख यांच्यावर द्वेष भावनेने एमआयएम पक्षाने टीका केल्याचे पाहायला मिळते. उलट एम आय एम ने तौफिक शेख यांची क्रेझ मुस्लिम समाजात वाढवण्याचे दिसून येते. “पैलवान नई जिंदगी मे रहेना चाहिए” अशी कार्यकर्त्यांची मनोमन भावना आहे.






















