युवकांनों ग्रंथपाल कोर्स करायचा आहे का ; आजच प्रवेश घ्या ; शुक्रवार शेवटचा दिवस
सोलापूर (प्रतिनिधी) सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ व पुणे विभाग ग्रंथालय संघामार्फत चालविल्या जाणाऱ्या ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा अभ्यासक्रमाचे वर्ग चालविण्यात येणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना या वर्गात प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यालय हुतात्मा स्मारक, मार्कंडेय उद्यान, अशोक चौक पोलीस चौकी समोर सोलापूर येथे 15 मार्च 2024 पर्यंत संपर्क साधावा. दररोज सकाळी दहा ते पाच पर्यंत अर्जाचे फॉर्म कार्यालयात उपलब्ध आहेत.
प्रशिक्षणार्थी किमान शालांत परीक्षा उत्तीर्ण असावा. शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयातील सेवकांना प्राधान्याने प्रवेश दिला जाईल. इतर उमेदवारासाठी दहावीचे गुण हेच प्रमुख निकष असतील. प्रवेश ग्रंथालय संचालक मुंबई पुणे विभाग ग्रंथालय संघ आणि सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ, सोलापूर यांच्या प्रचलित नियम अटीनुसार होतील.
हायस्कूल, कनिष्ठ महाविद्यालय, सार्वजनिक वाचनालय, हॉस्पिटल इत्यादी ठिकाणी ग्रंथपाल म्हणून काम करण्यासाठी हा कोर्स आवश्यक आहे. डीएड समकक्ष असा हा कोर्स आहे .प्रवेशासाठी संपर्क 9404 666 488 /7350922276 करावा असे आवाहन वर्गव्यवस्थापिका सारिका मोरे यांनी केले आहे.