ओ शिंदे साहेब, हा काय सातबारा आहे का ? वडील झाले की मुलगी त्या जागी यायला? लोकसभा निवडणुकी अगोदरच प्रत्योरोपांचा धुराळा
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजून प्रचाराला सुरुवात व्हायची आहे, मात्र आतापासूनच भाजपने प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. सोलापूर येथील काँग्रेसच्या कार्यक्रमात माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी “मला साथ दिली, प्रणिती शिदेंना सुद्धा द्या” असे आवाहन केल्यानंतर भाजपा सोलापूर जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे यांनी त्यावर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
“ओ साहेब, हा काय सातबारा आहे का? वडील झाले की मुलगी त्या जागी यायला ! यंदा पराभवाची हॅट्रिक होणार !” असे म्हणत “सोलापुरात रामराज्य येणार…!” असा सूचक इशाराही काँग्रेसला त्यांनी दिला आहे.
सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवार म्हणून पुढे आणले आहे मात्र भाजपचा उमेदवार अजून गुलदस्त्यात असून, तो २-३ दिवसात जाहीर होणार असल्याचे बोलले जात आहे. अशातच काँग्रेसचे प्रचाराला सुरुवात केली आहे, त्यावर भाजपा अतिशय आक्रमक पवित्र्यात आहे. भाजपचे जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे यांनी शिंदे यांच्या या वक्तव्याचा दाखला देत थेट आ. प्रणिती शिंदेंच्या पराभवाचे भाष्य केले आहे. भाजप मधील युवा नेते विकास वाघमारे यांनी ट्विट करत दिलेल्या प्रत्युत्तरात “सोलापुरात रामराज्य येणार” असा सुचक इशाराही काँग्रेसला दिला आहे. आगामी काळात प्रचारात भाजपा ही युवा आणि आक्रमक फौज घेऊनच जोरदार तयारीनीशी उतरणार असल्याचेच बोलले जात आहे.