२० वर्षांपासून फरार कुख्यात गँगस्टर प्रसाद पुजारीला मुंबई पोलिसांनी केली अटक
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई केली असून तब्बल वीस वर्षापासून होणार असलेल्या गँगस्टर प्रसाद पुजारीला चीनवरून शुक्रवारी रात्री भारतात आणण्यात आले.
विशेष म्हणजे गुन्हेगार हस्तांतरण संदर्भात चीनसोबत भारताचा कोणताही करार नसतानाही मुंबई पोलिसांनी ही कामगिरी पार पाडली आहे.
प्रसाद पुजारी याच चीनमधील अस्तित्वच बेकायदेशीर असल्याच पोलिसांनी सिद्ध करत त्याला भारतात आणल आहे. या संपुर्ण कारवाईवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सविस्तर लक्ष होते.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं पुजारीला रिमांडसाठी कोर्टात हजर केले असता शनिवारी सत्र न्यायालयाच्या विशेष मकोका कोर्टाने 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्रसाद पुजारीवर एकूण 8 गुन्हे दाखल असून ज्यात हत्या, खंडणी वसुली आणि फायरिंगचे गुन्हे आहेत. 4 गुन्ह्यात त्याच्यावर मकोका लावला आहे. त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस देखील जारी होती.