भावी जिल्हा परिषद सदस्यांना खुशखबर ! या तारखेला निघणार आरक्षण सोडत
सोलापूर : जिल्हा परिषद निवडणूक यांची प्रक्रिया अखेर सुरू झाली असून राज्य निवडणूक आयोगाने एक ऑगस्ट 2025 रोजी पत्र काढून मुंबई शहर, मुंबई उपनगर, भंडारा आणि गोंदिया हे जिल्हे वगळून इतर सर्व जिल्हाधिकाऱ्यांसाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची आरक्षण सोडत काढण्यासाठी सूचित केले आहे.
यामुळे तब्बल साडेतीन वर्ष प्रतीक्षेत असलेल्या भावी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
दिनांक सहा ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबर पर्यंत प्रारूप आरक्षण, हरकती, सूचना आणि अंतिम आरक्षण असा कार्यक्रम राहणार आहे. सोलापूर साठी आरक्षण सोडत ही 13 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत काढली जाणार आहे.