सोलापूर : सम्यक अॅकॅडमी आणि लोकराजा
फाऊंडेशन यांच्यावतीने आयोजित संविधान गौरव परीक्षेतील उत्तीर्ण स्पर्धकांना शिष्यवृत्ती वाटप समारंभ सोमवारी २५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता येथील शिवस्मारक सभागृह येथे आयोजित करण्यात आलेला आहे, अशी माहिती गौरव समितीचे अध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. गौरव समारंभाचे २५ वे आणि पुरस्कार वितरणाचे हे १० वे वर्ष आहे.
१) भगवान गौतम बुद्ध विशेष जीवनगौरव पुरस्कार प्राणिमित्र विलासभाई शिवालाल शहा. (माढा) वय वर्ष ९३,
२) विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष जीवनगौरव पुरस्कार -पार्थ पोळके. (सातारा) वय वर्ष ६५,
३) राजर्षी शाहू महाराज जीवनगौरव पुरस्कार -प्रा. डॉ. अभयकुमार साळुंखे (कोल्हापूर) वय वर्ष ७७,
४) महात्मा जोतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार राजेंद्र मागाडे (पुणे) वय वर्ष ६३,
५) छत्रपती शिवाजीमहाराज जीवनगौरव पुरस्कार दिगंबर विश्वनाथ ढेपे, सोलापूर वय वर्ष ७५,
६) छत्रपती संभाजी महाराज जीवनगौरव पुरस्कार प्रा. तानाजी अण्णासाहेब ठोंबरे वय वर्ष ८३,
७) माता रमाई भीमराव आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार- धम्मरक्षिता कांबळे (सोलापूर). वय वर्ष ६२,
८) राष्ट्रसंत गाडगेबाबा गुणवंत कर्मचारी पुरस्कार माधव कबीर माने, म्हैसगाव, ता. माढा. वय वर्ष ५०.
पुरस्काराचे स्वरूप :
सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, ग्रंथ, शाल, पुष्पहार देऊन सत्कारमूर्तीचा सपत्नीक सत्कार करण्यात येणार आहे.
या समारंभाला माजी आ. नरसय्या आडम मास्तर, माजी आ. दत्तात्रय सावंत, पोलिस निरीक्षक रईसा शेख, माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी तृप्ति अंधारे, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले, उपशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे, स्वाति हवेळे, प्राचार्य आशितोष शहा, पोलिस उपनिरीक्षक केरू जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या पत्रकार परिषदेला गौरव समितीचे अध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर, सचिव बोधिप्रकाश गायकवाड, पोलिस उपअधीक्षक रमेश सरवदे, रमेश लोखंडे, प्रा. युवराज भोसले, रवी देवकर, मिलिंद भालशंकर, प्रा. अभिजीत भंडारे, दाऊद अत्तार, दत्तात्रय शिंदे, बाळासाहेब डोळसे, संग्राम कांबळे, विजयकुमार लोंढे, लोकराजा फाऊंडेशनचे अध्यक्ष आशुतोष तोंडसे आदी पदाधिकारी उपस्थित होते.