नवे आयुक्त सचिन ओंबासे त्यांनी पदभार घेतला ; सोलापुरात यांना राहणार प्राधान्य
सोलापूर : महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नियुक्ती झालेले धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास सोलापूर महानगरपालिकेमध्ये येऊन आयुक्त शितल उगले यांच्याकडून पदभार स्वीकारला.
नव्या आयुक्त ओंबासे यांनी महापालिका आयुक्त पदाचा पदभार घेण्यापूर्वी सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले त्यानंतर त्यांचे महापालिकेत आगमन झाले.
पदभार घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना आयुक्त ओंबासे म्हणाले, शितल तेली उगले यांची प्रलंबित सर्व कामे पूर्ण करण्यावर भर राहील. सोलापूर महानगरपालिकेत येणारा प्रत्येक नागरिकाच्या चांगल्या सुविधा मिळतील याकडे लक्ष दिले जाईल. त्याचबरोबर सोलापूर शहराच्या पाण्याचा प्रश्न कायमच चर्चेचा राहिला आहे, दुहेरी जलवाहिनी लवकरात लवकर पूर्ण होण्याकडे आमचा फोकस राहणार आहे यासाठी प्रसार माध्यमांची मदत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.






















