खासदार प्रणिती शिंदे मध्यच्या मैदानात सक्रिय ; काँग्रेसच्या चेतन नरोटे यांनी प्रचारात ग्रीप घेतली ! थेट या नंबरवर
सोलापूर : सोलापूर शहर मध्य मतदारसंघ खासदार प्रणिती शिंदे यांचा बालेकिल्ला. त्या खासदार झाल्यानंतर या मतदारसंघात आता आमदार होण्यासाठी चढाओढ वाढली आहे. सध्या या मतदारसंघात भाजप कडून देवेंद्र कोठे, काँग्रेसकडून चेतन नरोटे, एमआयएम पक्षाकडून फारूक शाब्दि, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून आडम मास्तर हे रिंगणात असून चौरंगी लढत होत आहे.
काँग्रेसच्या चेतन नरोटे यांना शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहीर झाली. यापूर्वी या मतदारसंघातून ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री यांच्या नावाची चर्चा होती परंतु त्यांनी नकार दिल्याने शेवटी काँग्रेस पक्षाने नरोटे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली.
शहर मध्य आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी काँग्रेस पक्षाची धडपड सुरू आहे. काँग्रेसला यंदा देवेंद्र कोठे आणि फारूक शाब्दि यांचे आव्हान आहे. चेतन नरोटे आजपर्यंत तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे काँग्रेसचेच कार्यकर्ते बोलत होते.
मोची समाजातील काही कार्यकर्ते भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसचे अडचण वाढली होती पण जॉन फुलारे, श्रीदेवी फुलारे, संजय हेमगड्डी, बसवराज म्हेत्रे, आशा म्हेत्रे, दिनेश म्हेत्रे, माजी नगरसेवक विनोद भोसले, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, मुस्लिम समाजातील माजी महापौर आरिफ शेख माजी स्थायी समिती सभापती रियाज हुंडेकरी, माजी नगरसेवक तौफिक हत्तुरे, अल्पसंख्यांक अध्यक्ष जुबेर कुरेशी, युवकाध्यक्ष नजीब शेख या मुस्लिम नेत्यांनीही काँग्रेसचा जोरदार प्रचार सुरू केला आहे. जरी शौकत पठाण हे एमआयएम मध्ये गेले असले तरी त्यांचा काही फरक पडणार नाही असे दिसते.
तसेच मागील चार दिवसांपासून प्रणिती शिंदे सोलापुरात तळ ठोकून आहेत त्या प्रचारात सक्रिय झाल्या आहेत. काँग्रेसला या मतदारसंघातून कोणत्या कोणत्या भागातून मतदान होते त्या ठिकाणी आता प्रणिती शिंदे आणि चेतन नरोटे यांनी जोर दिला आहे.
तिसऱ्या नंबर वर असलेले नरोटे हे डायरेक्ट दुसऱ्या नंबर वर गेल्याचे बोलले जात आहे. प्रणिती शिंदे या मध्यच्या मैदानात उतरल्याने काँग्रेसने प्रचारात ग्रीप धरली आहे.
आता एमआयएमचे फारूक शाब्दि तिसऱ्या नंबर वर गेल्याची चर्चा सुरू झाली आहे. एक नंबर वर अजूनही देवेंद्र कोठे यांच्याच नावाची चर्चा होत आहे जर प्रणिती शिंदे यांनी जर आणखी जोर धरला तर काँग्रेस या प्रचारात नंबर वन वर जाईल असेही कार्यकर्ते बोलत आहेत.