मोहोळच्या राजकारणात सचिनदादांची वाढती क्रेझ ; उमेश पाटलांनी दिले विरोधकांना प्रत्युत्तर
सोलापूर : मोहोळ तालुक्याचा राजकारणात सत्ताधारी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच एकमेकांच्या विरोधात प्रचंड कुरघोड्या पाहायला मिळत आहेत. या तालुक्यात मात्र भाजप अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची मात्र चांगलीच क्रेझ पाहायला मिळतेय.
काही दिवसांपूर्वीच मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर या गावात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी आमदार राजन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार हे नेते उपस्थित होते. त्या कार्यक्रमाची ही तालुक्यात जोरदार चर्चा झाली.
पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनीही अंतर्गत विरोधकांना उत्तर देताना आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनाच बोलवून तालुक्यातच कार्यक्रम घेतला. अहिल्यानगरचे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राजेंद्र गुंड पाटील यांच्या चिंचोली एमआयडीसी मधील स्वरूप फार्मासिटिकल केमिकल युनिटचा शुभारंभ आमदार कल्याणशेट्टी यांच्या हस्ते झाला. चा कार्यक्रमाला आमदार देवेंद्र कोठे, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांचीही आवर्जून उपस्थिती होती.
उमेश पाटील यांनी सचिन कल्याणशेट्टी यांचा मोहोळचे पालक म्हणून उल्लेख करताना त्यांच्या कार्याचा प्रचंड गौरव केला. भारतीय जनता पार्टी वरील आणि आपल्या नेत्याप्रतीनिष्ठा कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणून त्यांनी सचिन कल्याणशेट्टी यांचा उल्लेख हि केला.
मोहोळच्या राजकारणात माजी आमदार राजन पाटील आणि जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्यात पक्षांतर्गत वाद जग जाहीर आहे. कार्यकर्ते एकमेका विरोधात प्रचंड कुरघोड्या करताना दिसून येते. असे असताना मोहोळ मध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नावाची क्रेझ चांगलीच वाढल्याचे पाहायला मिळते.