दादागिरी कराल तर खंडाळ्याचा बोगदा उतरू देणार नाही ; आमदार राजू खरे यांचा इशारा कुणाला
सोलापूर : मोहोळ तालुक्यातील अर्जुनसोंड या गावी आमदार राजू खरे यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील, शिवसेना नेते चरणराज चौरे, रमेश बारस्कर यांच्यासह मोहोळ तालुक्यातील अनेक मान्यवर नेते उपस्थित होते.
यावेळी आपल्या भाषणात राजू खरे यांनी विरोधकांवर चांगलीच तोफ डागली. विजय हा विजय असतो विरोधकांनी पराभव स्वीकारला पाहिजे परंतु आता जाणीवपूर्वक मोहोळ तालुक्यातील नेत्यांवर टीका केली जात आहे. यापुढेही दादागिरी चालणार नाही असं सांगताना दादागिरी कराल तर खंडाळ्याचा बोगदा सुद्धा उतरू देणार नाही असा थेट इशारा दिला. पहा आमदार खरे काय म्हणाले…