राजू खरेंचे राजकारण समजेना ! मी चुकून तुतारी हाती घेतली, मोहोळची अवस्था बीड पेक्षा वाईट
सोलापूर : मोहोळ चे आमदार राजू खरे यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघात चालत असलेली वाळू मुरूम आणि माती चोरीवरून प्रचंड नाराजी आणि संताप व्यक्त केला. यावेळी पालकमंत्र्यांशी बोलताना त्यांनी मी चुकून तुतारी हाती घेतली अजूनही बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक असल्याचे सांगत सभागृहाला आश्चर्यचकित केले.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये बोलतांना आमदार खरे म्हणाले, आपण दुष्काळी भागाचे पालकमंत्री झालात, पण आमच्या मतदारसंघात मुरूम, माती आणि वाळू उपसा होतो इथे सरंजामशही पद्धत आहे, शासनाचा महसूल बुडतो, मी तुमच्या सोबत अनेक वर्ष काम केले आहे, चुकून मला तुतारी घ्यावी लागली, मी बाळासाहेबांचा सैनिक आहे. 50 हायवा टीपर फिरतात, बीड पेक्षा वाईट परिस्थिती मोहोळ मध्ये आहे, महीला अधिकाऱ्यांवर गाडी घालावी लागली यावर कारवाई करा अशी मागणी त्यांनी करत राजकीय भूमिकेबाबत सर्वच आश्चर्यचकित झाले. दरम्यान बैठकी नंतर त्यांनी सविस्तर माहिती दिली.
पालकमंत्री गोरे यांनी, वाळू कारवाई दिसेल, त्यात कुणी अधिकारी कर्मचारी सहभागी असला तर त्याला सोलापुरात काम करण्याचा अधिकार नाही अशीही तंबी दिली.