अनंत जाधव यांच्यासाठी देशमुखच मालक ; महायुती नेत्यांच्या उपस्थितीत रंगणार कार्यक्रम
सोलापूर : प्रभाग क्र. 4 मधील दुर्गंधी मुक्त परिसर आणि स्वच्छ पिण्याचे पाणी नागरिकांना मिळावे म्हणून गेल्या 40 वर्षापासूनच्या जुन्या ड्रेनेज आणि पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईन बदलण्यासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या सहकार्याने तसेच माजी नगरसेवक अनंत जाधव यांच्या प्रयत्नातून तब्बल दोन कोटी निधी मंजूर झाला आहे.
2 कोटी निधी मंजूर नवीन पाणीपुरवठा लाईन व ड्रेनेज लाईन कामाचा उद्घाटन समारंभ शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता भवानी पेठ मराठा वस्ती येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात होणार आहे.
या शुभारंभ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. अनंत जाधव यांनी
या कार्यक्रमाला महायुतीतील नेत्यांना सन्मानपूर्वक निमंत्रण दिले असून त्यामध्ये अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार, एकनाथ शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांना निमंत्रित करण्यात आले आहे माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे, विनायक विटकर, राजाभाऊ काकडे, अजित गायकवाड, गौतम कसबे हे सुद्धा नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.