विजयकुमार देशमुखच पाचव्यांदा आमदार, या समाजाने केला एकमुखी निर्धार
२४८ विधानसभा मतदारसंघ महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयकुमार देशमुख यांना सोलापूर शहर गवळी समाज मेळाव्यात शुक्रवारी सायंकाळी पाठिंबा जाहीर केला.
यावेळी व्यासपीठावर राम बहिरवाडे, संजय शहापूरकर, मनीषा हुच्चे, आप्पा शहापूरकर, अक्षय तुकाराम अंजीखाने, राजाभाऊ परळकर, संतोष खंडेराव, मनोज मलकुनाइक, दत्ता लकडे, संजय जानगवळी, राहुल दहीहंडे आदींची उपस्थिती होती.
सोलापूर शहर गवळी समाज हा पारंपारिक भाजपचा मतदार असून मेहनत, प्रामाणिकपणा आणि कष्टाच्या जोरावर समाजामध्ये आदर्श ठरतो. कमी खर्चात आणि सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत वेळेचे नियोजन आणि शिस्त हे मी माझ्या लहानपणापासून पाहत आलो. त्यामुळे हा समाज मला पहिल्यापासूनच परिचित आहे. गवळी वाड्यात समाज बांधवांसोबत एकत्र राहून मोठा झालो आमदार झालो. समाजाचे कोणतेही समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. समाजाचा प्रत्येक घटकाचा विकास व्हावा यासाठी मी प्रयत्न करेन असे भाजप सेना राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांनी गवळी समाज मेळाव्यात आश्वासन दिले..
पुढे बोलताना आमदार देशमुख म्हणाले की, केंद्र शासनाने नागरिकांसाठी मागील दहा वर्षात अनेक योजना आणल्या. महाराष्ट्र राज्य शासनाने केंद्राच्या धर्तीवर महिला वर्गाच्या सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजना, उज्वला गॅस योजना, तीर्थ प्रवास योजना,एसटी प्रवासासाठी अर्धेतिकीट,विद्यार्थिनींना मोफत उच्च शिक्षण या प्रकारे अनेक योजना राबवून कष्टकरी समाजाला सहकार्य करण्याचे काम केलं. सोलापूर शहराला स्मार्ट सिटी यादीत समावेश करावा म्हणून पाठपुरावा केला. दुहेरी पाईपलाईन चे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शहराची पाण्याची समस्या त्यामुळे कमी होईल. लाडकी बहिण योजना महाराष्ट्र शासनाने जाहीर केल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार अशा पक्षांनी त्यावर न्यायालयात जाऊन थांबण्याचा प्रयत्न केला. या पैशामुळे अनेक गोरगरीब परिवारांना घरगुती मदत होत आहे. अशा योजनांना विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांना कशाचा त्रास होतोय ? जनतेचा फायदा होत असताना विरोध कशाला करत आहेत. यामुळे जनता यांना निवडणुकीत धडा शिकवेल असे आमदार देशमुख यांनी सांगितले.
तत्पूर्वी माजी नगरसेविका मनीषा हूच्चे यांनी आपल्या प्रास्ताविकात बोलताना म्हणाले की,गवळी समाज हा प्रत्येक निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या आणि देशमुख मालकांच्या मागे सक्षमपणे उभा आहे. आमदार देशमुख यांनी गवळी समाजाचे अनेक कामे केली आहेत. यामुळे संपूर्ण समाज प्रामाणिकपणे मालकांना निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. समाजातल्या सर्व वर्गासोबत आमदार देशमुख यांचं वैयक्तिक संपर्क असून समाजाचा एकतर्फी पाठिंबा देत असल्याचे भावना हूच्चे यांनी यावेळी व्यक्त केले.
मेळावा यशस्वी करण्यासाठी विनोद बडवणे, बबलू अंजीखाणे,अभिषेक कलागते, काशिनाथ बारसे,अक्षय साठे आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश कासार यांनी केले तर आभार नरेश लकडे यांनी मानले.