आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची तत्परता ; मुस्लिम शिक्षिकेच्या प्रश्नाला दिले प्राधान्य ; जलजीवन वर म्हणाले…..
सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपचे आमदार राम सातपुते यांचा पराभव झाला. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी त्यांना हरवले. या निवडणुकीत मुस्लिम समाजाने भाजपच्या विरोधात अतिशय इरस दाखवून मतदान केले. या एक गठ्ठा मतदानामुळे अनेक ठिकाणी भाजपच्या मताधिक्यावर परिणाम झाल्याचे दिसून आले. त्यात अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचा ही समावेश आहे.
दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी हे जिल्हा परिषदेमध्ये आले होते. आपल्या मतदारसंघातील अनेक कामे घेऊन त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकांदे यांची भेट घेतली.
कल्याणशेट्टी यांच्या आजूबाजूला मतदारसंघातील सरपंच, विविध कामे घेऊन आलेले कार्यकर्ते, कॉन्ट्रॅक्टर यांची मोठी गर्दी झाली होती. त्यांनी प्रत्येकाचे ऐकून घेतले. याचवेळी एक मुस्लिम समाजाची शिक्षिका बराच वेळ त्यांना भेटण्यासाठी थांबली होती. गर्दीतून जेव्हा त्यांना हे लक्षात आले त्यांनी लगेच तातडीने त्या शिक्षिकेची विचारपूस केली, कारण विचारले त्यांचा जो बदलीचा विषय होता तो लगेच मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केली.
जलजीवन मिशन अंतर्गत थांबलेल्या कामांसंदर्भात आपण सीईओ आव्हाळे यांच्याशी चर्चा केली असून ज्या ठेकेदारांच्या चुका आहेत त्यांच्यावर कारवाई करा, ज्या कामांच्या फाइल्स त्रुटीमुळे पेंडींग आहेत त्या त्रुटी तातडीने पूर्तता करून काम सुरू करा, जलजीवन सारख्या महत्त्वाच्या योजनांची कामे एवढ्या दिवस थांबणे योग्य नाही. त्यासाठी तातडीने पावले उचला असे सूचना आपण प्रशासनाला केल्या असल्याचे सांगितले.