पहिल्यांदाच आमदार झालेले, केवळ अडीच वर्षाचा कार्यकाळ मिळालेले, दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या मंगळवेढा आणि अनेक विकासाचे प्रश्न असलेल्या पंढरपूर शहराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या समाधान आवताडे यांनी यंदाचे नागपूर हिवाळी अधिवेशन चांगलेच गाजवले.
सोलापूर जिल्ह्यातील अकरा आमदारांपैकी नवखे समाधान आवताडे हेच दादा ठरले. अनेक प्रश्नांवर त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. काही प्रश्नावर ते आक्रमक तर काहींवर भावनिक झाले.
मंगळवेढा तालुक्यातील पाण्याचा प्रश्न, भीमा नदीवरील बंधाऱ्याचा प्रश्न त्यांनी अधिक गांभीर्याने सभागृहात मांडला. पंढरपूर शहरातील नगरपालिकेच्या प्रश्नावरही त्यांनी सभागृहात प्रकाश टाकला. मराठा व धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी त्यांनी लावून धरली. चेंबूर येथील विद्यार्थ्यांच्या विषबाधेवरही त्यांनी सभागृहात लक्ष वेधले.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आणिकगाव, चेंबूर, मुंबई येथील मुंबई महापालिकेच्या शाळेत वितरित करण्यात आलेल्या मध्यान्ह भोजनातून १६ विद्यार्थ्यांना विषबाधा प्रकरणी प्रश्न उपस्थित करत राज्यभर असे प्रश्न निर्माण होत आहेत यावरती सरकारचे लक्ष वेधले.
सकाळी दहा वाजता सभागृहात आलो आहे,
आता रात्रीचे ११ः३०वाजलेत अध्यक्ष महोदय १३-१३ तास बसलो आहोत, गंभीर प्रश्नांवर बोलायचं नाही, तर बोलायचं कशावरती?
अध्यक्ष महोदय, अजून थोडा वेळ मला हवा..
मतदारसंघातील जनतेच्या हितासाठी, जनतेच्या व्यथेला न्याय मिळवून देण्यासाठी पंढरपूर नगरपालिकेचे अनेक विषय त्यांनी यावेळी सभागृहाचे लक्ष वेधले.
मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात म्हैसाळचे पाणी “टेल टू हेड” मिळणेसाठी विधानसभेत केली मागणी केली. अगोदरच दुष्काळी तालुका असा कलंक असलेल्या मंगळवेढा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी हे पाणी तालुक्याला मिळणे अतिशय गरजेचे असल्याचेही यावेळी सांगितले.
उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी तालुक्यावर कोणत्याही प्रकारचा पाणी अनुषंगाने अन्याय न होऊ देता मंगळवेढा तालुक्यातील या योजनेच्या लाभार्थी गावांना पाणी देणार असल्याचे सांगितले आहे.
रात्री १२ वाजता मतदारसंघातील तसेच मराठा, धनगर तसेच महादेव कोळी समाजाच्या व इतर समाजांच्या आरक्षण विषयक तसेच बाकी महामंडळ निधी विषयक विविध मागण्या सभागृहात मांडल्या.
मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात तात्काळ निर्णय घेत समाजाला आरक्षण देण्यात यावे याकरिता मागणी केली आहे.
सोबतच धनगर तसेच महादेव कोळी समाज व बाकी अन्य समाजांच्या मागण्या मांडत सर्व समाजांच्या करिता स्थापन केलेल्या महामंडळांना सरकारने निधी देत सर्व समाजाची उन्नती साध्य करावी अशी मागणी केली आहे.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील तामदर्डी येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधकामासाठी त्वरित निधीची तरतूद करुन या कामासाठी सुरुवात करावी अशी मागणी आज नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लक्षवेधी मांडत असताना मी मागणी केली.