रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मागील भाजपची किरकीर संपेना ; पुन्हा एक नोटीस

भाजपचे विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या अडचणीत आणखी वाढ झाले असून रणजितसिंह मोहिते पाटील यांना सहकार विभागाची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आले आहे.
या नोटीसमुळे श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोलापूर डीसीसी बँकेच्या संचालक मंडळाने बेकायदेशीर कर्जवाटप केल्याप्रकारणी रणजितसिंह मोहिते पाटील यांना देखील जबाबदार धरण्यात आले आहे.
त्यामुळे सहकार कायद्याच्या कलम 88 नुसार ज्या संचालकाला वसुलीस जबाबदार धरले असेल त्या व्यक्तीचे सदस्यपद रद्द करण्याची तरतूद आहे. त्याचाच दाखला देत साखर कारखान्याचे सभासद भानुदास सालगुडे-पाटील यांनी तक्रार दाखल केली आहे.
या तक्रारीची दखल घेत सहकार विभागाकडून रणजितसिंह मोहिते पाटलांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. 16 जानेवारी रोजी सुनावलीला हजर न राहिल्यास किंवा उत्तर न दिल्यास मोहिते पाटलांचे अध्यक्षपद रद्द करण्यात येईल असेही नोटीस मध्ये सांगण्यात आलेय.
सहकार विभागाचे प्रादेशिक सहसंचालक प्रकाश अष्टेकर यांनी ही नोटीस बजावली आहे. (साभार- tv 9 मराठी)