भर पावसात भिजत आमदार राम सातपुते यांचा विजयाचा संकल्प ; औरादच्या सभेने वेधले लक्ष
सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार राम सातपुते यांच्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद गावात झालेल्या सभेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तर भर पावसात राम सातपुते यांच्या भाषणाने उपस्थितांची म्हणे जिंकली.
औराद गावात उमेदवार राम सातपुते आणि आमदार सुभाष देशमुख यांचे ग्रामस्थांनी अत्यंत उत्साहाने स्वागत करत ‘फिर एक बार मोदी सरकार’ अशा घोषणा देत उस्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी जाहीर सभेत उपस्थितांना मार्गदर्शन केले, गावागावांत होत असलेल्या विकासकामांची माहिती दिली. आज सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी एका कणखर नेतृत्वाची गरज आहे. तेव्हा पुन्हा एकदा सोलापुरात कमळ फुलावे तसेच लाडक्या मोदीजींना पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी एकत्रित येऊन काम करा असे आवाहन केले.
“मी तुमच्याच परिवारातील एक सदस्य असून येथून पुढचा माझा वेळ माझ्या या सोलापूरकर परिवाराच्या उन्नतीसाठी असणार आहे. मागील ५० वर्षांत जी कामे झाली नाहीत, ती कामे मागील १० वर्षांत मोदी सरकारच्या काळात झाली असून येथून पुढेही आपल्याला नवनवीन विकासकामे पाहायला मिळतील” अशी ग्वाही देत सातपुते यांनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधला.
“माझ्या परिवारातील तरुणांना नोकरीसाठी बाहेर जावे लागते, याकडे लक्ष देऊन आपल्या मतदारसंघामध्ये अनेक कंपन्यांना घेऊन येण्यासाठी मी काम करेन. जेणेकरून तरूणांना आपल्याच मतदारसंघात नोकरी मिळेल आणि त्यांना आपला परिवारासोबत राहता येईल. आदरणीय पंतप्रधान मोदीजींच्या विकसित भारत देशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा मोदी सरकारला संधी द्या!” असे आवाहन यानिमित्ताने केले.
या जाहीर सभेचे आणखी एक वैशिट्य म्हणजे वरुणराजाने सभेला उपस्थिती लावली. जणू टिप टिप बरसत लोकसभा विजयासाठी आशीर्वादच दिले.
याप्रसंगी विधानसभा प्रमुख हनुमंत कुलकर्णी, तालुकाध्यक्ष संगपा केरके, जिल्हा उपाध्यक्ष रामप्पा चीवडशेट्टी, जिल्हा उपाध्यक्ष मळसिद्ध मुगळे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष यतीन शहा, पक्षनेता अण्णाराव बासचारे, महिला मोर्चा अध्यक्ष अंबिका पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष आप्पासाहेब मोटे, सरचिटणीस अतुल गायकवाड, युवा मोर्चा अमोल गायकवाड, माजी सभापती संदीप तेळे, सरपंच शशिकांत गडदे, उपसरपंच अरविंद शेतसंदी, चेअरमन कृष्णप्पा पाटील, लिंगराज पाटील, मा. मुख्याध्यापक संगण्णा पाटील, राकेश वाले तसेच समस्त ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.