सोलापूर : आरोग्य सेवेत अग्रेसर असणारे माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आरोग्य सेवेवर सर्वांचे लक्ष वेधले. सोलापूरच्या शासकीय सर्वोपचार रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन वर्षभरापासून बंद आहे. याबाबत अनेक वेळा मागणी करूनही ते दुरुस्त होत नाही, नव्याने घेता येत नाही, यामुळे सर्वसामान्य रुग्णांचे प्रचंड हाल होतात. त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे जिल्हा नियोजन समिती मधून मशीन खरेदीला परवानगी द्या अशी मागणी केली. या विषयावर सुभाष देशमुख, आमदार समाधान आवताडे, आमदार विजयकुमार देशमुख यांनीही लक्ष वेधले.
एकूणच सर्व आमदार सदस्य आणि सभागृहा पाहून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पंधरा दिवस आपण वाट पाहू, सर्व आमदारांचे वजन वापरू नाहीतर जिल्हा नियोजन समिती मधून खरेदी करू अशी मान्यता दिली. काय चर्चा झाली पहा…