प्रणिती शिंदे पन्नास हजारच्या लिडने विजयी होणार ; महादेव कोगनुरे यांचा दावा
सोलापूर : उद्या मंगळवार चार जून रोजी लोकसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघाकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. काँग्रेसच्या हॅट्रिक आमदार प्रणिती शिंदे यांचा विजय निश्चित असल्याचे कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे परंतु किती मताधिक्याने त्या विजय होणार याबाबत वेगवेगळ्या आकडे समोर आले आहेत.
सामाजिक कार्यकर्ते, एम के फाउंडेशनचे अध्यक्ष तथा काही दिवसापूर्वीच काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले महादेव कोगनुरे यांनी प्रणिती शिंदे या 50 हजाराच्या मताधिक्याने विजयी होतील असा दावा केला आहे.
कोगनुरे म्हणाले, सोलापूरकरांनी प्रणिती शिंदे यांच्या मागील पंधरा वर्षाच्या कामांना पाहिले आहे. त्या थेट मतदारांच्या संपर्कात असतात. महिलांच्या कामांना प्राधान्य देतात, युवकांचे प्रश्न सोडवतात, कामगार, कष्टकरी, बेरोजगारांसाठी विधानसभेत आवाज उठवतात. त्यांनी केलेली काम हेच त्यांच्या विजयाचे खरे श्रेय असेल.
2019 ला जो लिंगायत मतदार आहे तो भारतीय जनता पार्टी सोबत राहिला होता परंतु यावेळी लिंगायत समाजाची तब्बल 50 टक्के मते प्रणिती शिंदे यांच्याकडे वळली आहेत. लिंगायत समाजातील नेते सिद्धेश्वर कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडादी, सिद्धाराम म्हेत्रे, सुरेश हसापुरे यांच्यासह चाकोते परिवार यांना मानणारा लिंगायत समाज यंदा प्रणिती शिंदे यांच्यासोबत राहिला आहे.
लिंगायत समाजासह धनगर समाज, मुस्लिम समाज, मराठा समाज, मागासवर्गीय समाज, मोची समाज, भटका विमुक्त समाज, बंजारा समाज या सर्वांची मते काँग्रेसला मिळाली असल्याने निश्चितच प्रणिती शिंदे या पन्नास हजाराच्या मताधिक्याने विजय होणार यात कोणतीही शंका नाही असा दावा कोगणुरे यांनी केला आहे.