आमदार प्रणिती शिंदे यांचा पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन प्रचाराचा शुभारंभ ; रामनवमीचा मुहूर्त ; मी कामच करणार, नाही तर कान पकडा
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी रामनवमी या दिवशीचा मुहूर्त सादर आपल्या प्रचाराचा शुभारंभ पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक होऊन नारळ वाढवून केला.
यावेळी त्यांच्या समवेत पंढरपूरचे प्रकाश पाटील, अभिजित पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, दक्षिणचे नेते सुरेश हसापुरे, अमर सुर्यवंशी, संदिप पाटील, जिल्हा युवक अध्यक्ष सुनजय पवार, प्रशांत साळे, पंढरपुर आणि मंगळवेढा तालुक्यातील असंख्य पदाधिकारी उपस्थित होते. या प्रचार सभेला युवक महिला यांचा प्रचड उत्साह दिसून आला.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, हा तालुका संतांचा असून कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे. या तालुक्यातून अनेक मातब्बर नेते स्व ओदबर अण्णा पाटील, यंशवतभाऊ पाटील, राजाराम पाटील, सुधाकरपत परिचारक, भारतनाना भालके, राजबापु पाटील होऊन गेले. या लोकांनी समाज कल्याणचेच कामे केले, कधी जाती धर्माचे राजकारण केले नाही. आताचे भाजप सरकार मात्र जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करुन घराघरात भांडणे लावत आहेत. पक्ष फोडत आहेत, घर फोडत आहेत, आता त्याना हद्दपार करा कॉंग्रेसला विजयी करा. मी निवडून आल्यानंतर कामच करेन नाही केलो तर कान पकडा.
रामनवमी निमित्त काँग्रेसच्या वतीने मतदार संघातील आठ ठिकाणी नारळ वाढवुन प्रचारचा शुभारंभ होणार आहे. त्यापैकी पढरपुर संपवून पुढे मार्डी येथील यमाई देवीचे मंदिर त्या ठिकाणी माजी आमदार दिलीप माने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष भारत जाधव आणि ग्रामस्थ यांची उपस्थिती होती. पुढे बाळ येथे खंडोबाच्या मंदिरात दर्शन घेऊन नंतर अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थांचे दर्शन त्यानंतर दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर, शहरातील मार्कडय मंदिर, सिध्देश्वर मंदीर, जगदंबा चौक येथे राममंदिर असे एकुण आठ ते दहा ठीकाणी प्रचारचा शुभारंभ होणार आहे. या संपूर्ण प्रचार दौऱ्याला सुरेश हसापुरे, सुशिल बदपटटे, विनोद भोसले, गणेश डोंगरे, प्रथमेश म्हेत्रे, नंदकुमार पवार, व तेथील स्थानिक लोकप्रतिनिधींसह इतर सर्व पक्षीय नेते उपस्थित राहणार आहेत.