आमदार प्रणिती शिंदेंचा दक्षिणमध्ये झंझावात ; हसापुरेंच्या नियोजनाने वातावरण काँग्रेसमय ; चिमणी, विमानसेवेकडे लक्ष वेधले
सोलापूर : आमदार प्रणिती शिंदे ह्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनतेची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणुन घेण्यासाठी गावभेट दौरा केला. पहिल्या टप्प्यात हत्तुर, बडकबाळ, वांगी, गावडेवाडी, कंदलगाव, अकोले, गुंजेगाव, अंत्रोळी, वडापुर, कूसुर, खानापूर, तेलगाव, भंडारकवठे, बाळगी, सादेपूर, माळकवठा या नदी काठच्या गावात भेट देऊन गावकऱ्यांच्या समस्या जाणुन घेतल्या.
यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधताना आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या, केवळ राजकीय सुडातून भाजप नेत्यांनी सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडली, प्रचंड नुकसान केले. पण विमानसेवा काही सुरू केले नाही. भाजपला पुन्हा साथ दिली तर आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखे होईल. गेल्या दहा वर्षात सोलापूरच्या निष्क्रिय आमदार, खासदारांनी सत्ता असूनही सोलापूरचा एकही प्रश्न मांडले नाही. विरोधी पक्षाचे एकमेव आमदार म्हणून मी सोलापूर जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न शासन दरबारी मांडते. रक्ताच्या नात्यापेक्षा विश्वासाचे नाते फार महत्वाचे असते. माझ्यावर विश्वास ठेवा तो विश्वास सार्थ करून दाखवेन आणि ते माझ्या शहर मध्य मतदारसंघात करून दाखविले. आपले काम करणाऱ्या विसरू नका. दक्षिण सोलापूरच्या विकासासाठी काँग्रेस पक्षासोबत रहा असे आवाहन केले.
दक्षिण तालुक्यात यापूर्वी जिल्ह्याचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्या माध्यमातून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत दोन ठिकाणी हुरडा पार्टी त्यानंतर जुळे सोलापूर भागातील भंडारी मैदानात व मंदुप येथे एक लाखाचे प्रणितीताई चषक आयोजित करून युवकांमध्ये काँग्रेस बद्दल वातावरण तयार केले, कंदलगाव येथे भव्य स्वरुपात कीर्तन कार्यक्रम घेऊन प्रणिती शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन घडवून आणले. या सर्व कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दक्षिण तालुक्यातील चांगले वातावरण निर्माण केले.
या गावभेट दौऱ्यात जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापूरे, तालुका अध्यक्ष हरीश पाटील, ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, अशोक देवकते, भीमाशंकर जमादार, मनोज यलगुलवार, विनोद भोसले, गणेश डोंगरे, वसंत पाटील, सतिष पाटील वडकबाळकर, अलाउद्दीन शेख, विठ्ठल पाटील, अनंत म्हेत्रे, दीपक नारायणकर, राधाकृष्ण पाटील, अरुण पाटील, रावसाहेब व्हणमाने, अरुणा बेंजरापे, सुरेखा पुजारी, प्रथमेश पाटील, सिद्धू शेजाळे, तिरुपती परकीपंडला, अमीर शेख, मुलगे मामा, सद्दाम शेख, बिराजदार सर, बापू पाटील, धर्मराज खडाखडे, सिद्धू व्हनमाने, राम साळवी, सिद्धाराम बगले, संगम्माताई सगरे, कैलास पाटील, सिद्धाराम घोडके, मौलाली पठाण यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.