आमदार प्रणिती शिंदेंना दक्षिण तालुक्याच्या दौऱ्यात प्रचंड प्रतिसाद ; महिलांमधून सर्वत्र स्वागत
सोलापूर : काँग्रेस महाविकास आघाडीच्या सोलापूर लोकसभेचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी शुक्रवारी दक्षिण सोलापूर तालुक्याचा गाव भेट दौरा सुरू केला आहे. त्यांचा तालुक्यातील दुसरा दौरा असून या दौऱ्यात त्यांना प्रचंड प्रतिसाद दिसून येत आहे ठिकठिकाणी महिलांमधून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले जात आहे.
गुरुवारी आमदार प्रणिती शिंदे यांचा दौरा हिपळे पासुन सुरुवात झाला. कणबस येथील महिलांनी त्याना ओवाळून स्वागत केले. तिथे बोलताना प्रणिती म्हणाल्या, महागाई वाढली, गॅस 1200 रुपये झाला, पेट्रोल रेट वाढले, शेतकरी याचे हाल होत आहेत. जीएसटीने तर सर्वांना त्रास होतोय, चिमणी पाडकाम करुन सिद्धेश्वर कारखाना बंद पाडला, मी काम करणारी आमदार आहे, तीन वेळेस मी मध्य मधून निवडुन आली. मी कामाची पक्की आहे, मी जात पात बघत नाही. या निवडणुकीत आपण काँग्रेस पक्षासोबत राहावे असे आवाहन त्यांनी केले.
हा दौर्याचे दक्षिणचे नेते सुरेश हसापुरे व तालुकाध्यक्ष हरीष पाटील यांनी चांगल्या प्रकारे नियोजन केले असल्याचे पाहायला मिळाले. या दौऱ्यात माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने, बाजार समिती संचालक बाळासाहेब शेळके, सुभाष पाटोळे, अनंत म्हैत्रे, जयशंकर पाटील यांच्या सह अनेक पदाधिकारी सोबत आहेत.