काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी व आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त धर्मा भोसले फाउंडेशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 69 जनांचे रक्तदान झाले.
माजी नगरसेवक विनोद भोसले यांच्या वतीने N. G. मिल चाळ बाल हनुमान मंदिर येथे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिराचा शुभारंभ स्व. धर्मा भोसले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सोलापुर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते करण्यात आला. या शिबिरात 69 जनांनी रक्तदान केले.
तसेच यावेळी नरोटे हे सोलापुर शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड होऊन एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना नरोटे म्हणाले, मानवी रक्ताला पर्याय नाही रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असून आपल्याला देता येईल, किंवा दान करता येईल अशा दोनच गोष्टी सोबत आहेत. त्यात पहिली म्हणजे ज्ञान आणि दुसरी म्हणजे रक्तदान. उत्तम ज्ञानाने एक उत्तम पिढी तयार होते तसेच रक्तदानाने एखाद्या गरजू व्यक्तीला नवं जीवन मिळतं अन् तो ताकदीने, नव्या उमेदीनं उभा राहतो. आपण केलेल्या रक्तदानामुळं कुणीतरी या जगात जगतोय यासारखा आनंद दुसरा असू शकत नाही.
या रक्तदान शिबिरात काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे, संयोजक विनोद भोसले, अमोल भोसले, शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, मनोज यलगुलवार, वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे, महिला अध्यक्ष प्रमिलाताई तुपलवंडे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे, अंबादास बाबा करगुळे, समीर शेख, सुशील बंदपट्टे, तिरुपती परकीपंडला, भीमाशंकर टेकाळे, राज सलगर, रूपेश गायकवाड़, अप्पा सलगर, दिनानाथ शेळके, सचिन गुंड, विवेक कन्ना, राजासाब शेख, अँड करिमुनिस्सा बागवान, शोभाताई बोबे, चक्रपाणी गज्जम, मुन्ना तळीखेड़े, मुनाफ चौधरी, बसु कोळी, शाहु सलगर, विनोद क्षीरसगर, प्रमोद दुर्गे, अजय क्षीरसागर, भारत शिंदे, अनिल कांबळे, सिद्धनाथ भोसले, सचिन तिकटे, मल्लू म्हेत्रे, पिंटू माने, विकास राठोड, उपस्थित होते.
हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी विनोद भोसले अमोल भोसले मित्रपरिवार यांनी परिश्रम घेतले.