आ. प्रणिती शिंदे व आ. सुभाष देशमुख एका विषयी अधिवेशनात आक्रमक ; सोलापूरचा हा प्रश्न गाजला
सोलापूर : सोलापुरात मंजूर झालेल्या श्री अन्न उत्कृष्टता केंद्र हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीला हलवल्याने त्यावर सोलापुरात बराच गदारोळ उडाला. भारतीय जनता पार्टीच्या आमदारांवर जोरदार टीका झाली. दरम्यान हा प्रश्न नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार प्रणिती शिंदे आणि आमदार सुभाष देशमुख यांनी उचलून धरला आणि बारामतीला हलविण्यात येणारे श्री अन्न उत्कृष्टता केंद्र हे सोलापुरातच राहावे अशी जोरदार मागणी केली.