सोलापूर शहराच्या राजकारणातील आश्वासक नेतृत्व : आमदार देवेंद्र दादा कोठे
*आज आमदार देवेंद्र दादांना 35 वर्ष पूर्ण होत आहे,वयाच्या 21 व्या वर्षी नगरसेवक म्हणून महानगरपालिकेत केलेली दमदार एन्ट्री व दोन टर्म कर्तव्यदक्ष नगरसेवक हा कार्यकाळ पूर्ण करून,लोकसभा निवडणुकीत केलेली दमदार बॅटिंग व योगी आदित्यनाथ यांच्या सभेतील ते हिंदुत्ववादी आक्रमक भाषणाने सर्वांची मने जिंकून भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांची व विशेषतः राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची नजर देवेंद्र दादांवर पडली व त्याच वेळी ठरले की शहर मध्य विधानसभेचा उमेदवार हे देवेंद्र दादा असतील*
*नगरसेवक म्हणून काम करताना प्रभागातील जनतेशी असलेला थेट संपर्क व महापालिकेत एक युवा नगरसेवक म्हणून शहराच्या प्रश्नाबाबत असलेली तळमळ पाहून अनेकाना वाटत होते की हा तरुण नगरसेवक आमदार झाला पाहिजे,मात्र प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ यावी लागते ती वेळ 2024लोकसभा निवडणुकीदरम्यान आली,नागपूर मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीत प्रवेश झाल्यानंतर देवेंद्र भाऊंनी देवेंद्र दादांचे पालकत्व स्वीकारले असे ज्यावेळी सोलापुरातील दैनिकात बातम्या प्रसिद्ध झाल्या त्यावेळी अनेकाना वाटले की निवडणूक असल्याने दिलेले हे चॉकलेट असेल,मात्र भारतीय जनता पार्टीत एक अशी यंत्रणा आहे जी काम करणाऱ्या सक्षम व्यक्तीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करते, व देवेंद्र दादांमधील असलेले राजकीय गुण व निवडणुकीत निवडून येण्याची त्यांच्यात असलेली क्षमता पाहून विधानसभेला त्यांना उमेदवारी मिळाली व या सगळ्या घडामोडी होताना अनेकांनी कुरघोड्या देखील केल्या,मात्र दादानी कधीच याची वाच्यता माध्यमांसमोर केली नाही आणि यालाच खरोखर राजकीय समजूतदारपणा म्हणून पाहिले जातं,कारण राजकारणात संयम फार महत्वाचा असतो व भारतीय जनता पार्टीत तरी हे गुण लागतेच व देवेंद्र दादानी दाखवलेला संयम व विधानसभेचे उमेदवारी मिळाल्यानंतर केलेली निवडणुकीची व्यूहरचना यामुळे सगळ्या राजकीय पंडितांचे दावे फोल ठरत 50 हजार पेक्षा जास्त मतांनी देवेंद्र दादानी विजय संपादन केला, व फडणवीस साहेबांनी उमेदवारी देऊन दाखवलेलं विश्वास सार्थ ठरविला*…
*सोलापूर शहरातील भाजपच्या राजकीय प्रवासात,आज अनेक नेत्यांनी योगदान दिले,आमदार देवेंद्र दादानी खूप कमी वेळेत भाजप समजून घेतला असे आज अनेक भाजपचे ज्येष्ठ नेते बोलताना दिसतात,कारण हिंदुत्ववादी विचारधारा तशी 2019 लोकसभा निवडणुकीत डॉ जय सिद्धेश्वर महास्वामी यांच्या प्रचारादरम्यान शिवस्मारक येथे केलेल्या भाषणादरम्यान दिसून आलेलीच होती,मात्र याच बरोबर सोलापूर शहराच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकार करीता एक युवा अभ्यासू नेतृत्वाची गरज होती ही गरज भरून काढण्याचे काम देवेंद्र दादानी आमदार झाल्यानंतर आपल्या 10 महिन्याच्या कालावधीत केलेल्या कार्यशैलीवरून दिसून येते,सोलापूर शहराच्या नागरिकांसाठी महत्वपूर्ण असलेला पाणी प्रश्न अनेक वर्षांपासून दुहेरी पाईप लाइन करीता अपुऱ्या निधीमुळे प्रलंबित होता,हा विषय अधिवेशनात मांडून शासन दरबारी पाठपुरावा करून सोडविला व पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांच्या मदतीने पाणी प्रश्नाबरोबर विमानसेवेचा विषय सोडविण्यात देखील महत्वपूर्ण भूमिका निभावली यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला सामोरे जाताना भाजप म्हणून केलेली सदर कामाची यादी जनतेसमोर घेऊन जाण्याची एक संधी मिळाली असून,लोकसभेला विरोधकांनी केलेल्या दिशाभूलने मोठा फटका बसला होता याला जर दुरुस्त करायचे असेल तर, पॉझिटिव्ह गोष्टी जनतेसमोर घेऊन जाणे गरजेचे आहे,याची जाणीव लक्षात ठेऊन दादानी पाठपुरावा करून शहरातील महत्वाचे कामे मंजूर घेतली आहेत*
*सोलापूरच्या तरुणांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेला,रोजगाराचा प्रश्न देखील मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहेब,पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांच्या मदतीने लवकरच सोडविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून,आई बापांपासून दुरावलेल्या लेकरांना पुन्हा आपल्या घरी परत घेऊन येण्याचे काम देखील देवेंद्र दादा नक्कीच करतील हा विश्वास वाटतो, व दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो की दादांसारखे कर्तृत्ववान युवा नेत्याला उदंड आयुष्य लाभो, व सोलापूर शहराच्या विकासासाठी त्यांची सुरू असलेली धडपड व सोलापूरचे सुजलाम,सुफलाम करण्यासाठी असलेली तळमळ पाहता त्यांच्या प्रत्येक कार्यास यश प्राप्ती होवो हीच प्रार्थना*……….
*अक्षय अंजिखाने*
*मंडल अध्यक्ष,मध्य पूर्व*