मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते शनिवारी आधार हॉस्पिटलचे उद्घाटन ; राठोड यांच्या निवासस्थानी देणार भेट
सोलापुरात नव्याने झालेल्या विजापूर रोड सैफुल येथील आधार क्रिटिकल केअर या हॉस्पिटलचे शनिवारी रोजी सायंकाळी साडे सात वाजता महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याची माहिती सोनई फाऊंडेशनचे विश्वस्त युवराज राठोड व आधार हॉस्पिटल क्रिटिकल केअर ची डॉ योगेश राठोड यांनी दिली.
राज्याचे मृदू व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे शनिवारी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत दोन महत्त्वाचे कार्यक्रम होणार आहेत त्यापैकी एक म्हणजे सोलापूर परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या आधार क्रिटिकल केअर सेंटर या हॉस्पिटलचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार असून त्यानंतर ते युवराज राठोड यांच्या जुळे सोलापूर येथील समर्थ नगर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट देणार आहेत.