एमआयएमच्या फारुख शाब्दी यांनी लोकसभा प्रचाराची हौस भागवली हैद्राबाद व औरंगाबादेत
सोलापूर: एमआयएमचे शहर आणि जिल्हा प्रमुख फारूक शाब्दी आपल्या टीम सह हैदराबाद लोकसभेच्या निवडणुकीत सहभागी झाले आहेत.हैदराबाद येथे होत असलेल्या निवडणुकीत असद ओवेसी यांच्या प्रचारात सोलापूर एमआयएमच्या टीमने जोमाने सहभाग घेतला.पदयात्रा काढली, सभा घेत कौंर्नर बैठका घेतल्या.
हैदराबाद येथून सोलापूरचे फारुख शाब्दी हे औरंगाबाद येथे इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी औरंगाबाद येथे दाखल झाले आहेत. औरंगाबाद येथे सभा,कॉर्नर बैठकावर भर असणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र प्रचार शिगेला पोहोचला आहे.एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी हे देखील हैदराबाद लोकसभा मतदारसंघातुन निवडणुकीत उभे आहेत. देशभरातुन असद ओवेसी यांना प्रतिसाद मिळत आहे. सोलापूर एमआयएमचे नेते हैदराबाद येथे प्रचारासाठी रवाना झाले आहेत. फारूक शाब्दी यांनी एका सभेत बोलताना भाजपवर निशाणा साधला आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघात भाजपचे डिपॉझिट जप्त होईल असा इशारा फारूक शाब्दी यांनी दिला आहे.
असद ओवेसी यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या माधवी लता उभ्या आहेत. सोलापूर जिल्ह्याची कार्यकारणी हैदराबाद येथे असद ओवेसी यांच्या प्रचारात सहभागी होऊन पदयात्रा,सभा,कॉर्नर बैठका,डोअर टू डोअर प्रचार करणार असल्याची माहिती फारुख शाब्दी यांनी दिली.
सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.हैदराबाद लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी मतदान होणार आहे. मतदाना अगोदर असद ओवैसी यांचा प्रचार जोमात करून भाजपाचे डिपाझिट जप्त करणार असल्याचा दावा फारुख शाब्दी यांनी केला आहे.
इलेट्रोल बॉण्ड प्रकणावरून भाजपला धरले धारेवर-
देशातील 80% टक्के इलेक्टोरोल बॉण्ड हैदराबाद येथे बनलेले आहे. भ्रष्टाचार करणाऱ्या सर्व पक्षास कमी-जास्त प्रमाणात या बॉण्डचा फायदा झाला आहे. बॉण्ड घेणारे सर्व पक्ष भ्रष्ट आहेत हे लक्षात येते अशी टीका फारुख शाब्दी यांनी केली आहे.