Wednesday, September 3, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

मंगळवेढेकरांनी केला आमदार समाधान आवताडे यांचा जंगी सत्कार ; हे तर मी माझे भाग्य समजतो

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
15 March 2024
in political
0
मंगळवेढेकरांनी केला आमदार समाधान आवताडे यांचा जंगी सत्कार ; हे तर मी माझे भाग्य समजतो
0
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंगळवेढेकरांनी केला आमदार समाधान आवताडे यांचा जंगी सत्कार ; हे तर मी माझे भाग्य समजतो

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील जनतेने मतदार संघातील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मतदानरुपी दिलेल्या आशीर्वादाला व संधीला मंगळवेढा तालुक्यातील २४ गावे उपसा सिंचन योजनेची मंजुरी घेऊन पात्र ठरलो ही माझे परमभाग्य असल्याचे भावनिक उद्गगार मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी काढले आहेत.

आमदार समाधान आवताडे यांच्या अथक प्रयत्नांतून अंतिम मंजुरी मिळालेल्या उपसा सिंचन योजनेतील समाविष्ट गावांच्या ग्रामस्थांनी व मतदार संघातील जनतेने आमदार आवताडे यांचा या कामगिरीबद्दल कृतज्ञता सत्कार आयोजित केला होता त्याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना आमदार आवताडे हे बोलत होते.

या कार्यक्रमाप्रसंगी प्रास्ताविक करताना भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण यांनी सांगितले की, विविध विकास कामांच्या रूपाने गेल्या अनेक वर्षांचा मतदार संघाचा निधीचा वनवास संपुष्टात आणणाऱ्या आमदार समाधान आवताडे यांचे या योजनेसाठी असणारे योगदान पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या विकासात्मक इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवले जाईल. दुष्काळी भागातील जनतेचा संवेदनशील मनाने विचार करून त्यांच्यासाठी अहोरात्र झटून त्यांच्या जीवनामध्ये राजयोग निर्माण करणाऱ्या आमदार आवताडे यांची कामगिरी मतदार संघातील जनता कदापि विसरणार नाही असे त्यांनी सांगितले.

तसेच दक्षिण भागातील शेतकरी राजू कुल्लोळी यांनी बोलताना सांगितले की, या योजनेला मंजुरी मिळाल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची असणारी प्रतीक्षा अखेर संपली आहे. बरं बोलण्यापेक्षा खरं बोलणारा आमदार म्हणून समाधान आवताडे यांची विश्वासहर्ता या कामगिरीमुळे आणखी वाढली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तनाळी मठाचे मठाधिपती ह.भ.प.दाजी महाराज, पंढरपूर पंचायत समिती माजी उपसभापती विजयसिंह देशमुख, ज्येष्ठ मार्गदर्शक दत्तात्रय जमदाडे, दामाजी शुगर संचालक अशोक केदार, यशोदा पतसंस्था चेअरमन नीला आटकळे, माजी सरपंच मरगु कोळेकर, सरपंच अनिल पाटील, सुरेश कांबळे, युवक नेते प्रसाद कळसे व व इतर ग्रामस्थ नागरिकांनी यावेळी आपली मनोगत व्यक्त करून आमदार आवताडे यांच्या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त करून त्यांचे विशेष अभिनंदन केले.

गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या या उपसा सिंचन योजनेसाठी आमदार समाधान आवताडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून वेळोवेळी अविरतपणे प्रयत्न करून हा प्रश्न मार्गी लावल्याने या भागातील जनतेचे भाग्य उजळले आहे. आमदार आवताडे यांनी केलेल्या अविस्मरणीय कार्यामुळे मंगळवेढा तालुक्याचे लवकरच नंदनवन होण्यास प्रारंभ होईल असा विश्वासही यावेळी उपस्थित जनतेने व नागरिकांनी व्यक्त केला आहे.

पुढे बोलताना आमदार समाधान आवताडे म्हणाले की, राज्य सरकारच्या माध्यमातून या योजनेला अंतिम मंजूरी मिळाल्यानंतर काही राजकीय मंडळींनी भविष्यकाळात येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या योजनेचे श्रेय घेण्यासाठी अक्षरश: स्पर्धा सुरू केली आहे. परंतु आपण कोणतीही राजकीय अभिलाषा अथवा स्वार्थ डोळ्यासमोर न ठेवता केवळ या भागातील जनतेला पाणी मिळाले पाहिजे हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून माझ्या आमदारकीच्या काळामध्ये प्रामाणिक प्रयत्न केले आणि त्यामध्ये मला सफलता प्राप्त झाली. त्यामुळे यापुढील काळामध्ये ही आपण कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता मतदार संघातील विविध पाणी योजना व इतर विकास कामे करण्यासाठी माझ्या रक्ताचे पाणी करेन पण जनतेला दिलेली वचने पूर्णच करेल असा ठाम विश्वास आमदार आवताडे यांनी व्यक्त केल्यानंतर उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडामध्ये त्यांना प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमासाठी विविध गावांचे सरपंच, उपसरपंच आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य नागरिक, शेतकरी व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Devendra fadnvisMangalwedha waterMLA samadhan awtade
SendShareTweetSend
Previous Post

भीम आर्मीच्या सोलापूर शहर अध्यक्षाला पोलिसांनी केले 2 वर्षासाठी तडीपार

Next Post

सोलापूरच्या उपोषण गेटने घेतला मोकळा श्वास मात्र अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाला बसला फास

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापूरच्या उपोषण गेटने घेतला मोकळा श्वास मात्र अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाला बसला फास

सोलापूरच्या उपोषण गेटने घेतला मोकळा श्वास मात्र अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाला बसला फास

ताज्या बातम्या

सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या चबुतर्यांवर नग्न अवस्थेत चढणाऱ्याचा मारहाणीत मृत्यू ; दोघांवर गुन्हा दाखल

सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या चबुतर्यांवर नग्न अवस्थेत चढणाऱ्याचा मारहाणीत मृत्यू ; दोघांवर गुन्हा दाखल

3 September 2025
पालकमंत्र्यांचे ‘दिलखूष’ झाले ; सुरेश पाटलांनी असे काय केले !

पालकमंत्र्यांचे ‘दिलखूष’ झाले ; सुरेश पाटलांनी असे काय केले !

3 September 2025
सोलापूर महापालिका निवडणुकीची प्रभाग रचना जाहीर ; पहा कोणत्या प्रभागात कोणत्या नगरा

सोलापूर महापालिका निवडणुकीची प्रभाग रचना जाहीर ; पहा कोणत्या प्रभागात कोणत्या नगरा

3 September 2025
राजकीय गणेशोत्सव ! पालकमंत्री गेले दिलीप मालकांकडे अन् सुभाष बापूंनी बोलावले चंद्रकांतदादांना

राजकीय गणेशोत्सव ! पालकमंत्री गेले दिलीप मालकांकडे अन् सुभाष बापूंनी बोलावले चंद्रकांतदादांना

2 September 2025
सोलापुरातील एकाच कुटुंबातील सलग तीन दिवसात चौघांचा मृत्यू ; ती रात्र आली काळ बनून

सोलापुरातील एकाच कुटुंबातील सलग तीन दिवसात चौघांचा मृत्यू ; ती रात्र आली काळ बनून

2 September 2025
धक्कादायक : कॅमेरामन दत्तराज कांबळे यांचे निधन

धक्कादायक : कॅमेरामन दत्तराज कांबळे यांचे निधन

2 September 2025
सोलापूरला दिल्ली दरबारी कायदेशीर मदतीची ग्वाही ; खा. उज्वल निकम यांचा केतन वोरा मित्र परिवाराने केला सत्कार

सोलापूरला दिल्ली दरबारी कायदेशीर मदतीची ग्वाही ; खा. उज्वल निकम यांचा केतन वोरा मित्र परिवाराने केला सत्कार

1 September 2025

क्राईम

सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या चबुतर्यांवर नग्न अवस्थेत चढणाऱ्याचा मारहाणीत मृत्यू ; दोघांवर गुन्हा दाखल

सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या चबुतर्यांवर नग्न अवस्थेत चढणाऱ्याचा मारहाणीत मृत्यू ; दोघांवर गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
3 September 2025
0

सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या चबुतर्यांवर नग्न अवस्थेत चढणाऱ्याचा मारहाणीत मृत्यू ; दोघांवर गुन्हा दाखल सोलापूर : बुधवारी पहाटेच्या सुमारास छत्रपती...

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

सोलापुरात जीएसटी नंबर साठी पाच हजाराची लाच घेतली ; दोन अधिकाऱ्यांना बेड्या

by प्रशांत कटारे
22 August 2025
0

सोलापुरात जीएसटी नंबर साठी पाच हजाराची लाच घेतली ; दोन अधिकाऱ्यांना बेड्या सोलापूर : ठेकेदाराला जीएसटी नंबर देण्यासाठी पाच हजाराची...

प्रमोद गायकवाड यांच्या जेल बदलीचा अर्ज मागे घेतला ; वैभव वाघे खून खटल्यात महत्वाची घडामोड

प्रमोद गायकवाड यांच्या जेल बदलीचा अर्ज मागे घेतला ; वैभव वाघे खून खटल्यात महत्वाची घडामोड

by प्रशांत कटारे
8 August 2025
0

प्रमोद गायकवाड यांच्या जेल बदलीचा अर्ज मागे घेतला ; वैभव वाघे खून खटल्यात महत्वाची घडामोड सोलापूर- सिध्दार्थ हौसिंग सोसायटी सोलापूर...

सोलापुरात पोलिसांचा दणका ! माजी नगरसेवक मुलासह तडीपार

सोलापुरात पोलिसांचा दणका ! माजी नगरसेवक मुलासह तडीपार

by प्रशांत कटारे
6 August 2025
0

सोलापुरात पोलिसांचा दणका ! माजी नगरसेवक मुलासह तडीपार सोलापूरच्या पोलिसांनी मोठा दणका दिला असून गोवंशय जनावरांच्या कत्तली करणाऱ्या माजी नगरसेवक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Aug    

Our Visitor

1861133
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group