मंडल अध्यक्षांनी दिलेला सपत्नीक वारीतील फोटो फ्रेम पाहून जयाभाऊ भारावले !
आमदार देवेंद्र कोठे यांच्या मध्य विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचा शुभारंभ मोठ्या थाटात पार पडला
या कार्यक्रमात शहर मध्य विधानसभेच्या तीन मंडल अध्यक्ष अक्षय अंजिखाने, नागेश सरगम व नागेश खरात यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा पंढरीची वारी यशस्वी केल्याबद्दल सपत्नीक वारीतील फोटो फ्रेम स्वागत करताना भेट दिला.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांना ही फोटो फ्रेम खूपच आवडली व ते सपत्नीक वारीची थीम असलेला फोटो फ्रेम पाहून भावूक झाले व त्यांनी आपल्या भाषणात ही मंडल अध्यक्षांनी केलेल्या स्वागताचा उल्लेख करताना ते म्हणाले, स्वागत तर माझे जिल्ह्यात राज्यात दौऱ्यावर अनेक कार्यक्रमात होत असतात, मात्र आज झालेले स्वागत मी विसरू शकणार नाही. कारण जो वारीतील माझा सपत्नीक फोटो फ्रेम मला मंडल अध्यक्षांनी दिला तो खूप सुंदर होता व पंढरीच्या नगरीचा पालकमंत्री आहे. याचा मला खरंच अभिमान वाटतो.