




शिवभक्तांसाठी 25 वर्ष अखंड उपक्रम ; महाशिवरात्री निमित्त ईच्छा भगवंताची परिवार देतो सेवा
सोलापूर – महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवचा आशीर्वाद घेण्यासाठी भक्त उपवास करतात आणि विशेष पूजा विधी करतात हे रात्र अंधकार आणि अज्ञानाचे प्रतीक मानले जाते या रात्री शिवाची पूजा करून भक्त अंधकारातून प्रकाशाच्या आणि अज्ञानातून ज्ञानाच्या मार्गावर जातात शिवाच्या दर्शनानं त्यांच्या जीवनातील दुःख आणि संकट दूर होतात अशी मान्यता आहे.
या पवित्र महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाचा आशीर्वाद घेण्यासाठी शिवभक्त उपवास करतात. दरम्यान प्रति वर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील ईच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीनं महाशिवरात्रीच्या निमित्ताने सोलापूर रेल्वे स्थानकासमोर उपासक शिवभक्तांसाठी मसाला दूध वाटपाचे कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.
यंदाच्या हे 25 वे वर्ष असून इच्छा भगवंताची मित्र परिवाराचे सर्वेसर्वा आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव यांच्या मार्गदर्शनाने आजतागायत ही अखंड सेवा सुरू आहे दरम्यान महाशिवरात्रीच्या निमित्ताने या दुध वाटप प्रसंगी हजारो शिव उपासक शिवभक्तांना लक्ष्मण मामा जाधव यांच्या उपस्थितीत या दूध वाटप कार्यक्रमाचे प्रारंभ करण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड, ईच्छा भगवंताची परिवाराचे मार्गदर्शक शिवाजी मामा गायकवाड, अनिल दादा जाधव, मोहन जाधव, विनोद गायकवाड,अड़वोकेट किरण गायकवाड,सचिन आंगडीकर, राष्ट्रवादी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड,तुषार गायकवाड,दर्शन दुबे,रेल्वे संघटनाचे राजाभाऊ जाधव,शुभम यमनाप्पा जाधव,अभिमन्यू आचारी, शरद शिंदे, संतोष लोंढे, राम पल्ली मिस्त्री, जयेश जाधव, व्यंकटेश बिटला, शशिकांत पल्ली, उमेश जाधव, संतोष गायकवाड, उमेश गुडा, निलेश कांबळे, कार्तिक जाधव, करण जाधव, अजिंक्य जाधव, प्रथमेश पवार, तेजस गायकवाड,उत्कर्ष गायकवाड,श्रीशैल चौगुले,सुरेश चडचणकर, मयूर सलगर,वसंत कांबळे, माणिक कांबळे, किरण मेरगु,शितल क्षीरसागर,सचिन जाधव ,राहुल जाधव आदींची होती उपस्थिती होती.
गेल्या 24 वर्षापासून आजतागायत अखंड सेवा ईच्छा भगवंताची मित्र परिवाराचे मार्गदर्शक आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव यांच्या मार्गदर्शनाने महाशिवरात्रीच्या निमित्ताने परिवाराच्या वतीने शिवभक्त उपासक भक्तांना दूध वाटप कार्यक्रमाची अखंड सेवा आज तागायत सुरू असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी सांगितले. दरम्यान हजारहून अधिक शिवभक्तांना यावेळी दूध वाटप करण्यात आले. रेल्वे स्थानकासमोरील विविध पाच स्टॉलच्या माध्यमातून दूध वाटप करण्यात आले.