सोलापूर-: दक्षिण सोलापूर मधून महादेव कोगनुरेंनी गोतावळा निर्माण केलाय. राजकारणापलिकडीची नाती जपणारा नेता, कार्यकर्ता अशी ओळख त्यांची तयार झालीय. त्यामुळेच काम कोणतेही असो, कुणाचा दवाखाना असो की कुणाच्या सोयरीकीचे काम की कुण्या मुलाचा शैक्षणिक विषय. फोन करायला महादेव कोगनुरे म्हणजे हक्काचा माणूस. यामुळे त्यांचा फोन सातत्याने खणखणत असतो. आपल्या प्रश्नांचे उत्तर तत्पररतेने महादेव कोगनुरेच सोडवू शकतात असा विश्वास त्यांच्या कार्याने तयार झालाय.
याचाच प्रत्यय म्हणजे हत्तुर येथे २७ नोव्हेंबर रोजी बोळुरे यांच्या घरात गॅस सिलेंडर चा स्फोट होऊन चार जण जखमी झाले होते तसेच त्यांचे आर्थिक नुकसान झाले होते कुटुंबाची परिस्थीती नाजूक असल्यामुळे पोट भरावं कि उपचार करावं असा गंभीर प्रश्न उभा होता.आज एम के फाऊंडेशन चे संस्थापक- अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी कुटुंबाची भेट घेत त्यांना संसारोपयोगी साहित्य व आर्थिक मदतीचा हात देवून सामाजिक बांधीलकी जोपासली.
समाजासाठी नेता नव्हे तर कार्यकर्ता या भावनेतून महादेव कोगनुरे झटताना दिसत आहेत, यामुळेच दक्षिण सोलापूर मधून लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.
याप्रसंगी शिवसेना (शिंदे गट) उपजिल्हा प्रमुख आनप्पा सत्तूबर, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपप्रमुख बनसिद्ध वडरे, माजी सरपंच बनसिद्ध कनपवडियार ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव बन्ने, सुर्यकांत पाटील, अनिल भरले, सोसायटी चेअरमन भीमशंकर कनवडिअर,अशोक कनपवडियार, सोमशेखर निगडी, शिवशरण मुलगे,मुख्याध्यापक व्हणमाने सर, विकास वाले,. श्रीकांत भरले,सोमनाथ वाघमोडे, प्रशांत सलगरे, ज्योत्यप्पा सिनेवडियार, राम पुजारी, भिमाशंकर सत्तुबार, राजकुमार सतूबर रमेश सत्तूबार, राजू कोठे, सोमनिंग सिनेवाडियार,मल्लू तडलगी, सोमनाथ उपासे, राजकुमार उपासे, लक्ष्मण कुंभार यांच्यासह एम के फाउंडेशनचे संचालक, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.