लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कधी लागणार? ; राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची शक्यता
सोलापूर : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ही येणाऱ्या 15 मार्चच्या आसपास लागेल अशी शक्यता राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सोलापुरात वर्तवली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 13 मार्च दरम्यान जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहे त्यामुळे 15 मार्चच्या दरम्यान भारत निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा होईल अशी शक्यता त्यांनी यावेळी वर्तवली.
देशपांडे यांनी सोलापुरात लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद उपजिल्हा निवडणूक अधिकारी निराळी, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भारत निवडणूक आयोग अतिशय सक्त धोरण अवलंबित आहे. मतदानाचा टक्का वाढावा म्हणून अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत तसेच 80 वर्षाच्या पुढील वृद्ध व्यक्तींना आणि दिव्यांग व्यक्तींना घरात बसून पोस्टल मतदान करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियावरील प्रचार तसेच पेड न्यूज याबाबत सायबर क्राईम विभाग लक्ष ठेवून आहे. निवडणुकीत वापरला जाणारा पैसा लिकर याला आळा घालण्यासाठी यंत्रणा सज्ज आहेत युवकांनी या निवडणुकीत मतदानाला प्रतिसाद द्यावा असे आवाहनही त्यांनी केले.