लिंगायत युवा नेता गुरू मोकाशी अपक्ष उत्तरच्या मैदानात ; कसब्यातून मालकांना धक्का
सोलापूर : लिंगायत समाजातील युवक सामाजिक कार्यकर्ता, रुग्णसेवक, कोविड काळात शेकडो रुग्णाचे जीव वाचवणारे गुरुशांत मोकाशी यांनी शहर उत्तर मतदार संघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यांचा अर्ज छाननीत मंजूर करण्यात आला आहे.
गुरुशांत मोकाशी हे शिवचंद्र सामाजिक संस्थेमार्फत दरवर्षी विविध सामाजिक कार्यक्रम राबवित असतात या संस्थेमार्फत दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार, गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण कार्यक्रम घेतात. कोविड काळात रुग्णाला बेड उपलब्ध करून अनेकांचे जीव वाचविले आणि कोविड मृत व्यक्तींचे नातेवाईकांना शासनाकडून आर्थिक मदत मिळण्याकरीता शासनाकडे पाठपुरावा करून अर्थसहाय मिळवून दिले. तसेच कोरोना मध्ये काम केलेल्या रुग्णाची सेवा करणारे डॉक्टर, नर्स, परिचारीका अशा व्यक्तींचा ही संस्थेमार्फत कोविड योद्धा म्हणून त्यांना गौरव करण्यात आले.
अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन मध्येही त्यांच्याकडे सोलापूर शहर सुशोभीकरण सदस्यपद ही जबाबदारी पार पाडली. मोकाशी यांचे मोठे बंधू प्रमोद मोकाशी हे महानगरपालिकेचे सन 2009 साली स्वीकृत झोन सदस्य होते. त्या काळात महेश कोठे हे सभागृह नेते असताना महालक्ष्मी दुध डेअरी ते कसबा गणपती मंदिर पर्यंत पिण्याचे पाईपलाईनचे काम केले मसरे गल्ली येथील परीट गल्ली देवी मंदिर येथील रस्त्याचे काँक्रिटीकरण व तसेच आपल्या वार्डातील स्ट्रीट लाईट बसवण्यात आले. रस्त्याला रामप्पा मसरे या नावाने मार्ग मंजूर करून घेतला. तसेच समाजातील विविध कार्यक्रम जसे नवरात्र, गणेशोत्सव, मकर संक्रांत व इतर कार्यक्रमात आवर्जून उपस्थित असतात. तसेच मराठा क्रांती मोर्चात सहभाग नोंदवला, मनोज जरांगे पाटील यांच्याही मराठा आंदोलनामध्ये सहभागी होते.
गुरुशांत मोकाशी यांनी भूषवलेली पदे..
*शिवचंद्र सामाजिक संस्थेचे संस्थापक* *श्रीमंत मानाचा कसबा गणपतीचे उत्सव अध्यक्ष
*श्री महात्मा बसवेश्वर मध्यवर्ती महामंडळाची ही उस्तव उपाध्यक्ष
*लिंगायत असोसिएशनची संचालक.
* अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे सोलापूर शहर सुशोभीकरण सदस्य