किरण माशाळकर यांना राज्यस्तरीय युवती आयकॉन पुरस्कार प्रदान
सोलापूर : स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य, मंत्रालय समन्वय समिती मुंबई यांच्या संयुक्तपणे महाराष्ट्र 2023 – 24 राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे (दि.5) रोजी शिवस्मारक सभागृह,नवी पेठ, सोलापूर येथे आयोजन करण्यात आले होते.

या पुरस्कार मध्ये आदर्श शाळा, शिक्षक, आदर्श मुख्याध्यापक, कर्मचारी, समाजसेवक,
आदर्श उद्योजक, आदर्श प्रशासकीय अधिकारी, आदर्श प्राध्यापक आणि आदर्श संस्था आदींची निवड करण्यात आली होती.
त्यामध्ये स्त्री शक्ती सोशल फाउंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा किरण माशाळकर यांना राज्यस्तरीय युवती आयकॉन पुरस्कार देण्यात आला. स्त्री शक्ती सोशल फाउंडेशन आणी समाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम केल्या बद्दल हा पुरस्कार मिळाला
या वेळी पुणे येथील उद्योगपती कारंडे, रणदिवे, शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे, स्वाभिमानी शिक्षक संघ प्रदेशाध्यक्ष बापुसाहेब अडसूळ यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. माजी नगरसेवक नारायण माशाळकर, केतन माशाळकर सत्तार शेख आदी ची उपस्थिती होती





















