Wednesday, October 15, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

कल्याणशेट्टी, माने, हसापुरे यांचीच सोलापूर बाजार समितीवर मालकी ; ग्रामपंचायत मध्ये मात्र बापूंनी ताणले !

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
28 April 2025
in Co -operative
0
कल्याणशेट्टी, माने, हसापुरे यांचीच सोलापूर बाजार समितीवर मालकी ; ग्रामपंचायत मध्ये मात्र बापूंनी ताणले !
0
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कल्याणशेट्टी, माने, हसापुरे यांचीच सोलापूर बाजार समितीवर मालकी ; ग्रामपंचायत मध्ये मात्र बापूंनी ताणले !

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार दिलीप माने, दक्षिणचे नेते सुरेश हसापुरे यांच्याच पॅनलचे वर्चस्व राहिले. बाजार समितीच्या 18 संचालकापैकी तब्बल 15 जागा जिंकण्यात कल्याणशेट्टी यांच्या श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलला यश आले तर आमदार सुभाष देशमुख यांनी उभे केलेल्या परिवर्तन पॅनल कडे ग्रामपंचायत च्या तीन जागा गेल्या. ग्रामपंचायत मध्ये मात्र आमदार बापू यांनी विरोधकांना चांगलेच ताणवल्याचे पाहायला मिळाले. मात्र या विजयाचे खरे  किंगमेकर माजी आमदार दिलीप माने आणि सुरेश हसापुरे हेच ठरल्याचे दिसून येते.

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पॅनल मध्ये दिलीप माने, सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे, श्रीशैल नरोळे, अविनाश मार्तंडे, इंदुमती अलगोंडा ही प्रमुख नेतेमंडळी होती. तर आमदार सुभाष देशमुख यांनी उभ्या केलेल्या पॅनलमध्ये त्यांचे चिरंजीव मनीष देशमुख, रामप्पा चिवडशेट्टी, आप्पासाहेब पाटील, चनगोंडा हवीनाळे, धनेश आचलारे त्यांच्यासह इतरांचा समावेश होता. बापूंनी या निवडणुकीत आमदार विजयकुमार देशमुख, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, राष्ट्रवादीचे काका साठे, महादेव चाकोते, जाफरताज पाटील, बाळासाहेब शेळके या नेत्यांची मदत घेतली होती. त्याचा ग्रामपंचायत मध्ये निश्चितच फायदा झाला.

 

रविवारी या निवडणुकीसाठी तब्बल 96 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे निकाल काय लागणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड यांनी सुरुवातीला सर्वात हॉट समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत मतदार संघाचे मतमोजणी घेतली. या मध्ये आमदार सुभाष देशमुख यांच्या पॅनलने बाजी मारत चार पैकी तीन जागा जिंकल्या. सर्वसाधारण मधून मनीष देशमुख, रामप्पा चीवडशेट्टी तर अनुसूचित जाती मतदारसंघातून अतुल गायकवाड हे तिघे विजयी झाले. आर्थिक दुर्बल मधून मात्र यतीन शहा यांना पराभवाचा धक्का बसला त्या ठिकाणी कल्याणशेट्टी समर्थक सुनील कळके हे विजयी झाले. ग्रामपंचायत मध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर रवी रोकडे आणि संगमेश बंगले पाटील यांना पराभवाचा धक्का बसला.

मनीष देशमुख यांनी पहिलीच निवडणूक जिंकल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला त्यांच्या जल्लोषासाठी मतमोजणी केंद्राबाहेर युवा कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.
@ग्रामपंचायत सर्वसाधारण
मनीष देशमुख 635
रामपा चिवडशेट्टी 614
गणेश वानकर 479
संगमेश बगले पाटील 371

@ग्रामपंचायत अनुसूचित जाती
अतुल गायकवाड 589
रवी रोकडे 518

@ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल
सुनील कळके 570
यतीन शहा 537

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/04/VID20250428141051.mp4

 

व्यापारी मतदारसंघातून संघटनेने दिलेले उमेदवार मुस्ताक चौधरी व वैभव बरबडे हे दोघे विजय झाले आहेत. त्यांनी अमोल बिराजदार व मल्लिनाथ रमणशेट्टी यांचा पराभव केला. या निवडणुकीत लिंगायत समाज एकवटलेला पाहायला मिळाला, त्यामुळे मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग झाले होते परंतु संघटनेने दिलेले दोन्ही उमेदवार विजयी झाले.
@मिळालेली मते
मुस्ताक चौधरी 623
वैभव बरबडे 661
अमोल बिराजदार 535

हमाल तोलार मतदारसंघातून माजी आमदार दिलीप माने समर्थक गफार जब्बार चांदा हे सुमारे 111 मतांनी निवडून आले आहेत. यापूर्वी चार वेळा त्यांनी निवडणूक लढवली परंतु यावेळी त्यांना यश मिळाले. (गफार जब्बार चांदा 373, शिवानंद पुजारी 262, भीमराव सीताफळे 160, दिपक गडगे 131)

सोसायटी मतदारसंघातून शेतकरी विकास पॅनलने बाजी मारली असून सोसायटी मतदारसंघातील सर्वसाधारण महिला आर्थिक दुर्बल आणि इतर मागासवर्ग या सर्व 11 ते 11 उमेदवार तब्बल 800 मताच्या फरकाने विजयी झाले आहेत. सोसायटी मतदारसंघातून कपबशीला मतदारांनी स्वीकारले असून नारळ नाकारला आहे. या निकालाने दिलीप माने व सुरेश हसापुरे यांची सोसायट्यांवर असलेली पकड पुन्हा एकदा स्पष्ट झाली.

 

सोसायटी मतदारसंघ
*श्रीशैल नरोळे☕*1244
*उदय पाटील☕*1276
*प्रथमेश पाटील☕*1268
*नागण्णा बनसोडे☕*1276
*दिलीप माने☕*1362
*राजशेखर शिवदारे☕*1366
*सुरेश हसापुरे☕*1355

सोसायटी महिला राखीव मतदारसंघ
इंदूमती अलगोंडा 1327
अनिता विभुते 1288

सोसायटी इतर मागासवर्ग
अविनाश मार्तंडे 1345

सोसायटी आर्थिक दुर्बल
सुभाष पाटोळे 1243

निकालानंतर बाहेर पडताना मनीष देशमुख आणि संचालक सुरेश हसापुरे यांची भेट झाली या दोघांनीही राजकीय संस्कृती जपत एकमेकांची गळाभेट घेतली.

या निकालानंतर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या उपस्थितीत दिलीप माने, सुरेश हसापुरे राजशेखर शिवदारे आणि त्यांच्या पॅनलच्या विजयी उमेदवारांनी विजय सर्टिफिकेट घेतले.
विजयानंतर कार्यकर्त्यांनी मतदान मोजणी केंद्राबाहेर एकच जल्लोष केल्याचे पाहायला मिळाले. ग्रामपंचायत मध्ये आलेल्या अपयशाचे आम्ही सर्व नेते चिंतन करू अशी प्रतिक्रिया देताना हा विजय सर्वसामान्य शेतकरी आणि कार्यकर्त्यांचा असल्याचे सचिन कल्याणशेट्टी यांनी दिलीप माने यांनी सांगितले.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/04/VID-20250428-WA0031.mp4

 

Tags: @bazar committee election#Sachin kalyanshettyDilip ManeMLA Subhash deshmukhSuresh hasapureकृषी उत्पन्न बाजार समितीबाजार समिती निवडणूकसोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती
SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकिंग : कल्याणशेट्टी, माने, हसापुरे पॅनलचे सोसायटीमधून सर्व 11 उमेदवार 800 च्या फरकाने विजयी

Next Post

शिस्तीच्या किरण गायकवाड यांनी मारले ‘मार्केट ‘ ; ‘हॉट इलेक्शन’ हाताळले ‘कूल’ 

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
शिस्तीच्या किरण गायकवाड यांनी मारले ‘मार्केट ‘ ; ‘हॉट इलेक्शन’ हाताळले ‘कूल’ 

शिस्तीच्या किरण गायकवाड यांनी मारले 'मार्केट ' ; 'हॉट इलेक्शन' हाताळले 'कूल' 

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजपने काँग्रेसचे प्रभाग फोडले ; बाबा मिस्त्री तौफिक शेख यांना आणले आमने-सामने

सोलापुरात भाजपने काँग्रेसचे प्रभाग फोडले ; बाबा मिस्त्री तौफिक शेख यांना आणले आमने-सामने

14 October 2025
अभिषेक कदम खूनप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या तालुकाध्यक्षास जामीन

जन्मठेप शिक्षा झालेल्या आरोपीला उच्च न्यायालयात जामीन मंजुर

14 October 2025
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी पॅटर्न आता राज्यभरात लागू होणार

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी पॅटर्न आता राज्यभरात लागू होणार

14 October 2025
त्या सनातनी ‘राकेश किशोर’वर कारवाई करा ; काँग्रेस प्रदेश सचिव श्रीशैल रणधिरे यांची मागणी

त्या सनातनी ‘राकेश किशोर’वर कारवाई करा ; काँग्रेस प्रदेश सचिव श्रीशैल रणधिरे यांची मागणी

14 October 2025
सोलापूर काँग्रेस सेवा दलाचे ‘वोट चोर, गद्दी छोड’ स्वाक्षरी अभियान

सोलापूर काँग्रेस सेवा दलाचे ‘वोट चोर, गद्दी छोड’ स्वाक्षरी अभियान

13 October 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी सोलापुरात ; विमान आणि चॉपरनेच फिरणार जिल्ह्यात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी सोलापुरात ; विमान आणि चॉपरनेच फिरणार जिल्ह्यात

13 October 2025
सोलापूर झेडपी मध्ये आरक्षणाची चर्चा ; अनेकांची तोंड पडली ; पहा जिल्ह्यात कुणाकुणाला बसला धक्का

सोलापूर झेडपी मध्ये आरक्षणाची चर्चा ; अनेकांची तोंड पडली ; पहा जिल्ह्यात कुणाकुणाला बसला धक्का

13 October 2025
अक्कलकोटच्या दोन पाटलांना धक्का ; राष्ट्रवादीच्या काकांची ही झाली अडचण ; सोलापूर जिल्हा परिषद सदस्यांचे आरक्षण जाहीर

अक्कलकोटच्या दोन पाटलांना धक्का ; राष्ट्रवादीच्या काकांची ही झाली अडचण ; सोलापूर जिल्हा परिषद सदस्यांचे आरक्षण जाहीर

13 October 2025

क्राईम

अभिषेक कदम खूनप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या तालुकाध्यक्षास जामीन

जन्मठेप शिक्षा झालेल्या आरोपीला उच्च न्यायालयात जामीन मंजुर

by प्रशांत कटारे
14 October 2025
0

जन्मठेप शिक्षा झालेल्या आरोपीला उच्च न्यायालयात जामीन मंजुर सारोळे ता. बार्शी येथे पत्नी मिनाक्षी साबळे हिचा खुन केल्याच्या आरोपावरुन जन्मठेप...

सोलापूर जिल्ह्यात मंडल अधिकाऱ्याला चाळीस हजाराची लाच घेताना पकडले

सोलापूर जिल्ह्यात मंडल अधिकाऱ्याला चाळीस हजाराची लाच घेताना पकडले

by प्रशांत कटारे
9 October 2025
0

सोलापूर जिल्ह्यात मंडल अधिकाऱ्याला चाळीस हजाराची लाच घेताना पकडले तलाठ्याने घेतलेली नोंद फेटाळली असल्याचे सांगत पुन्हा नोंद मंजूर करण्यासाठी पन्नास...

सोलापुरात ‘शाहरुख’चा हातात सत्तूर घेऊन धिंगाणा ; “तेरे को खत्म करता नही तो मेरू को कुच करके तेरो को गुताता”

सोलापुरात ‘शाहरुख’चा हातात सत्तूर घेऊन धिंगाणा ; “तेरे को खत्म करता नही तो मेरू को कुच करके तेरो को गुताता”

by प्रशांत कटारे
8 October 2025
0

सोलापुरात 'शाहरुख'चा हातात सत्तूर घेऊन धिंगाणा ; "तेरे को खत्म करता नही तो मेरू को कुच करके तेरो को गुताता"...

“ये तो साला एक दिन होना ही था ” ; पोलिसांनी वेळीच ऍक्शन घेतली असती तर…. ; चर्चा रंगली

“ये तो साला एक दिन होना ही था ” ; पोलिसांनी वेळीच ऍक्शन घेतली असती तर…. ; चर्चा रंगली

by प्रशांत कटारे
4 October 2025
0

"ये तो साला एक दिन होना ही था " ; पोलिसांनी वेळीच ऍक्शन घेतली असती तर.... ; चर्चा रंगली सोलापूर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2025
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Sep    

Our Visitor

1899246
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group