“पुढारी आले की आपण वाकून काम करतो रे” ; माध्यमिक शिक्षणाधिकारी एका विषयात का झाले भावूक !!!
सोलापूर : माध्यमिक शिक्षण विभाग म्हणजे अनेक तक्रारी, प्रश्न, समस्या घेऊन दररोज शेकडो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी शिक्षणाधिकाऱ्यांकडे येतात. प्रशासकीय कामकाज करताना या शिक्षकांची गाऱ्हाणी ऐकायला शिक्षणाधिकाऱ्यांना वेळ देता येत नाही. त्यामुळे सोलापूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी संवाद दिन आयोजित केला होता. दुर्दैव त्या उपक्रमाकडे शिक्षकांनी व इतर कर्मचाऱ्यांनी पाठ फिरवली. ती नाराजी शिक्षणाधिकारी जगताप यांनी बोलून दाखवली.
मंगळवारी शिक्षणाधिकारी सचिन जगताप हे आपल्या कार्यालयात प्रत्येक लिपिकाला घेऊन त्यांच्या फाईल काढत होते. यात एक फाईल त्यांच्या हातात आली, त्यांनी पाहिले तर जानेवारी 2021 मध्ये उच्च न्यायालयाने त्या फाईलवर निर्णय दिला होता आणि संबंधित विधवा महिलेला पेन्शन देण्याच्या सूचना केल्या होत्या परंतु चार वर्षे होऊन शिक्षण विभागाने त्याकाळी कडे गांभीर्याने पाहिले नाही.
ती फाईल पाहून जगताप यांनी “पुढारी आपल्यासमोर आले की आपण वाकून काम करतो, पण इथे गरिबाला अजूनही न्याय मिळत नाही, जानेवारी 2021 मध्ये कोर्टाचा निकाल होऊनही त्या महिलेला पेन्शन मिळाली नाही, आता जानेवारी 21 पासून राहिलेली पेन्शन व्याजासह त्या महिलेला मिळावी म्हणून आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बार्शी तालुक्यातील एका शिक्षकाचे निधन झाल्याने त्यांच्या पत्नीला पेशन लागू झाली होती परंतु दुसऱ्या एका महिलेने आपण संबंधित शिक्षकाची पहिली पत्नी असल्याचे सांगून तक्रार केली होती त्यामुळे त्या महिन्याची पेन्शन थांबवण्यात आली ती महिला आपले सर्व कागदपत्रे घेऊन उच्च न्यायालयात गेली आणि तिच्या बाजूने निकाल लागला होता.