सोलापुरातून छोट्या ‘पुष्पा’चे अपहरण ; बिस्किट आणायला गेला तो….
सोलापूर शहरात दिवसेंदिवस लहान मुले, सोळा ते वीस वयोगटातील मुली, लग्न झालेल्या महिला यांच्यासह आता वयस्कर महिला, पुरुष सुद्धा बेपत्ता झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. पुन्हा एकदा सोलापुरातून एका बारा वर्षाच्या मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार एमआयडीसी पोलीस ठाण्यात आली आहे. त्या मुलाचा फोटो पाहून तो पुष्पा अर्थात दक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन यांचा फॅन असल्याचे पाहायला मिळते.
अपहत मुलगा नामे नविन बालाजी पोगुल वय-12 वर्षे 09 महीने राहणार-P-17, राहुल कलेक्शन, अक्कलकोट रोड, जुना कुभांरी नाका, M.I.D.C, सोलापुर हा दिनांक 14/02/2025 रोजी दुपारी दोन वाजण्याचे सुमारास राहत्या घरातून बिस्कीट आणायला जातो म्हणून निघून गेला आहे, तो अद्यापर्यंत त्याच्या राहत्या घरी न आल्याने त्यास कोणीतरी अज्ञात इसमांने कशाचे तरी अमिष दाखवून फुस लावून पळवून नेले आहे.
अशी तक्रार मुलाच्या कुटुंबियांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल केले आहे. तो मुलगा इयत्ता आठवीला असून अंगात पोपटी रंगाचा शर्ट व पिवळ्या रंगाची पॅन्ट आहे. कुठे दिसल्यास अथवा सापडल्यास एमआयडीसी पोलिसांची संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.