सोलापूर जिल्हा परिषद शुक्रवारी सकाळी दोन मिनिटे राहणार ‘निशब्द ‘
सोलापूर : कोलकाता येथील शिकाऊ डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या आणि बदलापूर येथील शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सोलापूर जिल्हा परिषद महिला कर्मचारी युनियनच्या वतीने शुक्रवार 23 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता पॉर्च मध्ये दोन मिनिटांसाठी निशब्द आंदोलन करण्यात येणार आहे.
पंचायत समिती स्तरावर त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्र, किंवा ज्या ठिकाणी आपली कार्यालय आहे त्या ठिकाणी सर्व कर्मचारी एकत्रित येऊन दोन मिनिटे निशब्द थांबून कोलकाता प्रकरणी श्रद्धांजली आणि बदलापूर घटनेचा निषेध व्यक्त करण्याचे ठरले आहे.