“गड्या आपली झेडपीच बरी” डॉन परत आला, चेल्यांना झाला आनंद
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेमधून बदली झालेले कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांची पुन्हा सोलापूर जिल्हा परिषदेमध्येच नियुक्ती झाली आहे. कुलकर्णी यांना सोलापूर जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता क्रमांक दोन या पदावरच पुन्हा नियुक्ती देण्यात आली असून तसे पत्र 30 सप्टेंबर 2025 रोजी प्राप्त झाले.
सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये डॉन म्हणून ओळख निर्माण केलेले संतोष कुलकर्णी हे पुन्हा जिल्हा परिषदेत आल्याने त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना आनंद झाल्याचे सांगण्यात आले.
कुलकर्णी यांची बदली मागील काही महिन्यांपूर्वी झाली होती. त्यांना राष्ट्रीय महामार्ग विभागात कार्यकारी अभियंता पदावर नियुक्ती देण्यात आली होती परंतु त्या ठिकाणी त्यांना हजर होत आले नाही दरम्यान काही दिवसांपूर्वी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतल्यानंतर त्यांना पुन्हा जिल्हा परिषदेच्या आहे त्याच पदावर नियुक्ती मिळाली आहे.