सोलापूर झेडपीत महीला कर्मचाऱ्यांना महीला दिना अगोदर मिळाले गिफ्ट ; सीईओ, डेप्युटी सीईओ यांचे होतेय कौतुक
सोलापूर : अनेक वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या सुमारे 61 चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम आणि सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी झाली पदोन्नती दिल्याने मंगळवारी जिल्हा परिषदेमध्ये पेढे वाटून कर्मचाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांच्या दालनातील मीटिंग हॉलमध्ये कर्मचाऱ्यांचे समुपदेशन घेण्यात आले. त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये प्रचंड गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. परिचर मधून कनिष्ठ लिपिक या पदोन्नतीसाठी शेकडो कर्मचारी जिल्हा परिषदेत आले होते.

समुपदेशन पद्धतीने आणि पारदर्शकपणे ही पदोन्नती झाल्याचे पाहायला मिळाले समुपदेशानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना जागेवरच नियुक्ती आदेश देण्यात आले त्यामुळे आदेश घेऊन अतिशय आनंदी चेहऱ्याने कर्मचारी बाहेर पडत होते त्यांच्या नातेवाईकांची सुद्धा मोठी गर्दी झेडपीत दिसून आली.
महिला कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर तर आनंद ओसंडून वाहत होता, अनेक वर्षापासून आम्ही प्रतीक्षेत होतो परंतु आज आम्हाला सीईओ जंगम आणि डेप्युटी सीईओ पाटील यांनी पदोन्नती दिल्याने आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो अशा भावना व्यक्त करण्यात आल्या.
61 पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात महिला कर्मचारी आहेत त्यामुळे येणाऱ्या आठ मार्च महिला दिनाच्या अगोदरच मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी त्यांना मोठे गिफ्ट दिल्याने त्यांचे संपूर्ण जिल्हा परिषदेतील कर्मचारी संघटना आणि कर्मचाऱ्यांमधून स्वागत होत आहे.