सोलापुरात वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभेचा मोर्चा ; बौद्धांच्या प्रश्नांकडे वेधले लक्ष
सोलापूर : तात्काळ बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्त करण्यात यावे, बुद्धगया येथील महाबोधी महाविहार 1949 चा व्यवस्थापन अॅक्ट मध्ये तात्काळ दुरुस्ती करून महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धांच्या हाती देण्यात यावे, बुद्धगया महाबोधी महाविहार येथे सुरू असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती
आंदोलनातील सर्व मागण्या त्वरित मंजूर करण्यात याव्यात, जगभरातील व देशातील सर्व बौद्ध बांधवांच्या भावनेचा विचार व आदर करून 1949 च्या व्यवस्थापन अॅक्ट दुरुस्ती करावी या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर शहरात वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने मोठा मोर्चा काढण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन हा मोर्चा सिध्देश्वर मंदीर, पासपोर्ट कार्यालय, सिध्देश्वर प्रशाले मार्गे जिल्हा परिषदेच्या उपोषण गेट समोर आला. समाज बांधव या मोर्चामध्ये हातात विविध मागण्यांचे फलक घेऊन सहभागी झाले होते, जय भीम व नमो बुद्धाय असा जयघोष करण्यात आला.
या मोर्चात भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब वाघमारे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत मडीखांबे, सरचिटणीस नागसेन माने, कोषाध्यक्ष मीनाक्षी बनसोडे, धम्मरक्षीता कांबळे, शांता गजभिये, पल्लवी सुरवसे, निर्मला कांबळे, नंदा काटे, अशा शिवशरण, बबन कांबळे, अतिश बनसोडे, सुनिता गायकवाड, सुचित्रा थोरे, शितल दंदाडे, शांतीकुमार नागटिळक, नाना कदम, आनंद गायगवळी, मिलिंद प्रक्षाळे, प्रदीप ताकपेरे, शिवाजी बनसोडे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.