सोलापुरात तडीपारीचा वाढदिवस ; अन्याय झाल्याने सैपन शेख यांनी केला निषेध
सोलापूर : सोलापूर शहरातील एमडी ट्वेंटी फोर न्यूज चैनल चे संपादक सैपन शेख यांनी आपल्या तडीपरीचा वाढदिवस तर साजरा केलाच पण आपल्यावर अन्याय झाल्याचा तीव्र निषेध नोंदवला.
एक वर्षांपूर्वी सैपन शेख यांना तडीपार करण्यात आले होते त्यांनी पुण्यामध्ये थांबून आपले प्रशासनाविरोधात आंदोलन चालूच ठेवले होते. त्यानंतर या विरोधात त्यांनी विभागीय आयुक्तांकडे अर्ज करून त्यातून ते बाहेर पडले.
आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोध दर्शवत त्यांनी शहरातील महापुरुषांना अभिवादन करून गळ्यामध्ये अन्यायकारक तडीपारीचा पहिला वाढदिवस साजरा करत जिल्हा परिषदेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारासमोर एक कापून निषेध नोंदवला.