सोलापुरात स्वामींच्या मदतीला आला सागर ; काम झाले झटापट अन् दाखले मिळाले पटापट
सोलापूर : दहावी निकाल लागल्यानंतर मुलांच्या पुढील प्रवेशासाठी उत्पन्न, रहिवास, जात तसेच नॉन क्रिमिलर अशा वेगवेगळ्या दाखल्यांची आवश्यकता असते. त्यामुळे पालकांची तारांबळ उडते. प्रशासनावर ही कामाची लोड वाढतो. अशातच दुष्काळात तेरावा या म्हणीप्रमाणे सोलापुरात बहुतांश संपूर्ण महाराष्ट्रात असा प्रकार घडला की दाखले मिळण्यास मोठी अडचण निर्माण झाली.
शासनाने दाखल्यांच्या डिजिटल सहीसाठी प्रांताधिकाऱ्यांना जो अंगठा लावण्याची मशीन जी दिली होती त्या मशीनची कंपनी अचानक बदलली त्यामुळे सुमारे शहरातील दीड ते दोन हजार दाखले प्रलंबित राहिले. एका वेळी किमान पाचशे दाखले व्हायचे आता ते प्रत्येक एका दाखल्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची डिजिटल सही घ्यायची अशी पद्धत सुरू आहे.
त्यामुळे तहसीलदार कार्यालय आणि प्रांताधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यावर मोठा ताण पडला, बाहेर शेकडो नागरिक मुलांचे दाखले द्या म्हणून यायचे, प्रत्येकांचे समाधान करायचे ही कर्मच्यांसाठी तारेवरची कसरत होती.
पण उपविभागीय अधिकारी क्रमांक एक या कार्यालयातील महसूल सहाय्यक सुरेश स्वामी या कर्मचाऱ्याने प्रांताधिकारी सदाशिव पडदूने यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय मनापासून आणि झोकून देऊन काम केले, दिवसा नागरिकांचा त्रास नको म्हणून रात्री किमान दोन वाजेपर्यंत ऑफिसमध्ये बसून त्यांनी लोकांना दाखले वेळेवर मिळावेत म्हणून काम केले. अजूनही त्यांच्या कामाचा स्पीड कमी झालेला नाही.
तर उत्तर तहसील कार्यालयातील ऑपरेटर कर्मचारी सागर याने सुद्धा तहसीलदार निलेश पाटील, नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगिरे, महसूल सहाय्यक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले काम या दाखले वितरणात केले आहे, करीत असल्याचे पाहायला मिळाले. जोपर्यंत तहसील मधून अर्ज व्हेरिफिकेशन करून पुढे जात नाही तोपर्यंत काहीही करता येत नाही. या दोघांच्या जलद कामामुळे नागरिकांना वेळेवर सर्वच दाखले मिळत आहे हे कौतुकास्पद म्हणावे लागेल.